ETV Bharat / bharat

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला होणार 1 जुलैपासून सुरुवात, जाणून घ्या कसा असेल यात्रेचा प्रवास आणि सुरक्षा

अमरनाथ यात्रा 2023 ला 1 जुलैला सुरूवात होत आहे. या यात्रेतील पहिली तुकडी जम्मू बेस कॅम्पवरुन 30 जूनला रवाना होणार आहे. अमरनाथ यात्रा तब्बल 62 दिवस चालणार असून या यात्रेत तगडी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Amarnath Yatra 2023
अमरनाथ मंदिर
author img

By

Published : Jun 28, 2023, 7:47 AM IST

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या अमरनाथ यात्रा 2023 ला 1 जुलैपासून सुरूवात होत आहे. अमरनाथ यात्रेतील पहिली तुकडी 30 जून रोजी जम्मूतील भगवती नगरात असलेल्या बेस कॅम्पमधून काश्मीरसाठी रवाना होणार आहे. यात्रेसाठी अनेक ठिकाणी ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 2022 मध्ये 3.45 लाख भाविकांनी पवित्र अमरनाथ गुहेला भेट दिली असून यावेळी हा आकडा पाच लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमरनाथ यात्रेचा 62 दिवसांचा आहे प्रवास : अमरनाथ मंदिर दक्षिण काश्मीर हिमालयात 3 हजार 880 मीटर उंचीवर आहे. भगवती नगर येथील जम्मू बेस कॅम्पमधून पहिली तुकडी 30 जूनला पवित्र गुहा मंदिराच्या 62 दिवसांचा प्रवाससुरू होणार आहे. त्याचबरोबर वार्षिक तीर्थयात्रा 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमरनाथ यात्रेचे दोन मार्ग असून एक लांब आणि एक लहान आहे. अमरनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग त्यांच्या सोयीनुसार आणि अडचणीच्या पातळीनुसार भाविक निवडू शकतात.

बालटाल मार्ग : बालटाल ते अमरनाथ प्रवास करणार्‍यांसाठी बालटाल ते डोमाली, बरारी, संगम मार्गे अमरनाथ गुहा असा मार्ग आहे. या मार्गावर बालटालपासून सुरुवात करून पहिला थांबा डोमाली येथे संपतो. या मार्गाचे अंतर अंदाजे 2 किमी आहे. येथून बरारी 6 किमी आणि संगम 4 किमी अंतरावर आहे. यानंतर अमरनाथ गुहा फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. हा सर्वात लहान मार्ग असून याला फक्त 1 ते 2 दिवस लागतात. बालटाल ते अमरनाथ गुहेपर्यंतचा मार्ग सुमारे 14 किलोमीटर लांब आहे. हा मार्ग थोडा अवघड असला तरी, या मार्गावर कोणतीही वाहनव्यवस्था नाही.

पहलगाम मार्ग : दुसरा मार्ग पहलगामवरुन असून या मार्गाने अमरनाथ गुहेचे अंतर 36 ते 48 किलोमीटर आहे. ते पूर्ण होण्यास 3 ते 5 दिवस लागतात. पहलगामची अमरनाथ यात्रा पहलगामच्या बेस कॅम्पपासून सुरू होऊन चंदनवारी येथे संपते. बहुतेक यात्रेकरू या मार्गाला प्राधान्य देत असून हा मार्ग बालटाल मार्गापेक्षा अधिक सुंदर आहे. हा प्रवास पहलगाम येथून चंदनवाडी, पिसू टॉप, झोजी बाल, नागा कोटी, शेषनाग, वारबल, महागणस टॉप, पायबल, पंचतरणी, संगम मार्गे सुरू होतो आणि चंदनवारी येथे संपतो. चंदनवारीपासून 13 किलोमीटरचा ट्रेक भाविकांना शेषनागपर्यंत घेऊन जातो, त्यानंतर पंचतरणीपर्यंत 4.6 किलोमीटरचा ट्रेक होतो. येथून 2 किमी चालत गेल्यानंतर भाविकांना भगवान शिवाचे निवासस्थान असलेल्या अमरनाथ गुहेकडे जाता येते.

भाविकांना हेलिकॉप्टर मार्गाची सुविधा : काही भाविकांना अमरनाथ यात्रा करण्याची इच्छा असते, मात्र चालण्यास त्रास होतो, ते अमरनाथ हेलिकॉप्टर सेवा निवडू शकतात. बालटाल आणि पहलगाम येथील हेलिपॅडवरून अमरनाथसाठी हेलिकॉप्टर सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. अमरनाथ गुहेपर्यंत पालखी भाड्याने घेण्याचेही पर्याय आहेत. पण ते भाविकांना गुहेत पोहोचण्याच्या अलिकडे 2 किमीवर सोडतात. मात्र बालटाल मार्गावर हा पर्याय उपलब्ध नाही.

  • बालटाल - पंचतरणी - बालटाल मार्ग (पंचतरणी ते पवित्र गुहा 2 किमी प्रवास)
  • पहलगाम - पंचतरणी - पहलगाम मार्ग (पंचतरणी ते पवित्र गुहा 6 किमी प्रवास)

अमरनाथ यात्रेत तगडी सुरक्षा व्यवस्था : उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यापूर्वी अमरनाथ यात्रा 2023 चा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. यावेळी गुहा मंदिराच्या रक्षणाची जबाबदारी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांकडे (ITBP) सोपवण्यात आली असून सीआरपीएफ पायऱ्यांच्या खाली तैनात असेल. मार्गावर इतर सहा ठिकाणी ITBP आणि BSF चे जवान देखील तैनात केले जातील, हे काम सहसा CRPF द्वारे केले जाते. हिंसाचारग्रस्त मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांसाठी CRPF तुकड्या मोठ्या संख्येने तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा दलाला काश्मीर खोऱ्यातील यात्रा मार्ग सुरक्षित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डीजीपींनी दिल्या तगड्या सुरक्षा व्यवस्थेच्या सूचना : जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी वार्षिक अमरनाथ यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्यावर भर दिला. पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत डीजीपी दिलबाग सिंग यांनी संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लंगर, भोजनालय आणि पेट्रोल पंप यासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत.

  • यात्रेकरूंच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करण्याच्या सूचना.
  • पोलीस हेल्पलाइन क्रमांकांसह यात्रा मार्गावर होर्डिंग्ज लावण्याचे निर्देश डीजीपींनी दिले आहेत.
  • रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना.
  • वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवले जात आहेत कॅमेरे.
  • अनावश्यक जाम टाळण्यासाठी, लेन शिस्त सुनिश्चित करण्याच्या सूचना.
  • वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना वायरलेस कव्हरेज केले जाईल प्रदान.

महामार्गाची स्थिती दिसणार स्क्रीनवर : जम्मू वाहतूक पोलिसांचे एसएसपी फैसल कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनपूर, नगरोटा आणि कुंजवानी या तीन ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. महामार्गाची स्थिती स्क्रीनवर प्रदर्शित होईल. हे स्क्रीन प्रथमच बसवण्यात येत आहेत. त्यावर पवित्र गुहेकडे जाणाऱ्या मार्गाची स्थिती दिसेल. रस्त्याची परिस्थिती आणि हवामानाची माहिती 24 तास स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.

सीआरपीएफच्या पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महासंचालक एसएल थाओसेन यांनी बालटाल बेस कॅम्प आणि पवित्र गुहा मंदिराकडे जाणाऱ्या अनेक थांब्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अमरनाथ यात्रा 2023 साठी तैनात CRPF च्या ऑपरेशनल आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बालटाल, डोमेल, सरबल आणि नीलग्रथ येथे असलेल्या कॅम्पला भेट दिली.

बीएसएफचे जवानही सज्ज : यात्रा यशस्वी करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे जवानही सज्ज आहेत. बीएसएफचे उपमहानिरीक्षक चित्र पाल यांनी १ जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा हे आमचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आमचे जवान पूर्णपणे सज्ज आणि सतर्क असल्याची माहिती दिली. गेल्या वर्षी 8 जुलै 2022 रोजी ढगफुटीसारखी घटना घडल्या होत्या. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरात 13 जणांचा मृत्यू झाला. हे लक्षात घेता कोणतीही अनपेक्षित दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दलाला वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Another cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, ४ हजार यात्रेकरूंची सुटका
  2. Amarnath Yatra Cloudburst : अमरनाथ गुहेच्या परिसरात ढगफुटी.. १६ मृत्युमुखी.. ४० जण बेपत्ता
  3. Video : अमरनाथच्या ढगफुटीनंतरचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ.. पहा ढगफुटीनंतरची भीषण परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.