ETV Bharat / bharat

बाबूल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास, फेसबुकवर भलीमोठी पोस्ट, वाचा काय म्हणाले...

भाजपा खासदार बाबूल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. याची घोषणा त्यांनी शनिवारी केली. आई-वडील, पत्नी, मित्र यांचा सल्ला घेतल्यानंतर मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Babul
बाबूल सुप्रियो
author img

By

Published : Aug 1, 2021, 10:03 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार असलेले गायक बाबूल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. याची घोषणा त्यांनी शनिवारी केली. आई-वडील, पत्नी, मित्र यांचा सल्ला घेतल्यानंतर मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. बाबूल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास हा भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत मन मोकळं केलं.

मी आता जातोय, अलविदा. एक महिन्याच्या आत मी आपलं निवासस्थान सोडेल. तसंच खासदारकीचाही राजीनामा देत आहे राजकरणात न राहता देखील सामाजिक कार्य करता येते. समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात जाणर नाही. टीएमसी, कॉंग्रेस किंवा सीपीएम कोणत्याही पक्षाने बोलावले नाही. मी एकाच टीमचा प्लेयर आहे. तसेच मी एकाच टीमला नेहमी साथ दिली आहे. #MohunBagan (बंगालची फुटबॉल टीम मोहन बगान) आणि राजकारणात फक्त भाजपा. अमित शाह आणि जे. पी. नड्डांकडे राजकारण सोडण्याबाबत बोललो आहे. त्यांनी मला प्रेरणा दिली. याबद्दल त्यांचा आभारी आहे, असं असे बाबुल सुप्रियो यांनी आपल्या लांबलचक फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2014 आणि 2019 मध्ये मोठे अंतर

जेव्हा मला भाजपाकडून तिकिट मिळाले. तेव्हा मी एकटा होतो. मात्र, आज बंगालमध्ये भाजपा मुख्यविरोधी पक्ष आहे. आज भाजपात अनेक नवे युवा नेता आहेत. तसेच वरिष्ठ नेताही आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी वाटचाल करेल, हे अधोरेखीत करायची गरज नाही. तसेच बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य नेतृत्वासोबत मतभेद होते. काही मुद्दे सार्वजनिकरित्या बाहेर आले होते. यास मीही जबाबदार आहे. तसेच अन्य नेतेही जबाबदार आहे. मात्र, आज कोण जबाबदार आहे, हे मला जाणून घ्यायचे नाही. पक्षातील वरिष्ठ नेते मतभेद आणि भांडणांमुळे दुखावले जात आहेत. एखाद्याला समजून घेण्यासाठी 'रॉकेट सायन्स' ज्ञानाची गरज नाही. तसेच आसनसोलच्या नागरिकांचा भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आभारी आहे.

अनिश्चिततेला न घाबरता पाऊल टाकलं -

विमानात प्रवासादरम्यान एकदा रामदेव बाबांशी छोटीशी बातचीत झाली होती. पश्चिम बंगाल निवडणूक भाजपा गंभीरतेने लढणार होती. मात्र, एकही जागा जिंकण्याची अपेक्षा पक्षाने ठेवली नसल्याचे कळाले. हे मला आवडले नाही. असा का विचार करण्यात आला. बंगाली तर श्यामा प्रसाद मुखर्जी होते. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदी निवडण्यात आले. यो दोघांना बंगालने प्रेम दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा देशाने निवडलं. पुढेही तेच येतील. याच्या उटल बंगाल विचार करणार नाही. आता सर्वांचं ऐकून मी एक निर्णय घेतला आहे. अनिश्चिततेला न घाबरता जो विचार केला, तेच केलं. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची नोकरी सोडून मुंबईला जाताना 1992 मध्ये असंच केलं होतं. आता पुन्हा तेच करत आहे, असं बाबुल सुप्रिया यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2014 सालापासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये निरनिराळ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. ते दोन वेळा आसनसोलचे खासदार राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते तृणमूलचे अरूप विश्वास यांच्याकडून पराभूत झाले होते. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या अलीकडेच झालेल्या विस्तारात त्यांना वगळण्यात आले. यावेळी भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट लिहून आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा - ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवणे हेच आव्हान - बाबुल सुप्रियो

हेही वाचा - २०२१ पर्यंत पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस मुक्त राज्य होईल - बाबुल सुप्रियो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.