ETV Bharat / bharat

Warrant To zubair By Police : कोर्टात हजर व्हा, लखीमपूर खिरी पोलिसांनी बजावले पत्रकार जुबेरला वॉरंट

लखीमपूर खिरी पोलिसांनी ( Lakhimpur Kheri Police ) अल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद जुबेर ( Alt News reporter Mohamed Zubair ) यांना एक वर्षापूर्वीच्या प्रकरणात वॉरंट जारी केले आहे. पोलिस अधिक्षक संजीव सुमन यांच्या म्हणण्यानुसार जुबेरवर यापूर्वीच एक खटला दाखल झालेला आहे. त्यावर सुनावणीसाठी त्यांना 11 जुलैला कोर्टात हजर व्हावे लागेल.

Jubair
Jubair
author img

By

Published : Jul 9, 2022, 10:27 AM IST

लखीमपूर खिरी - अल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद जुबेर ( Alt News reporter Mohamed Zubair ) यांना सीतापूरमध्ये दाखल केलेल्या खटल्यात सुप्रिम कोर्टाने जामीन दिला आहे. तथापि, आता लखीमपूर खिरी पोलिसांनी ( Lakhimpur Kheri Police ) जुबेरला एक वर्ष आधीच्या एक प्रकरणात वॉरंट जारी केले आहे. 11 जुलैला त्यांना कोर्टासमोर हजर व्हावे लागेल. पोलिस अधिक्षक संजीव सुमन यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील मोहम्मदी येथे राहणारे सुदर्शन न्यूजचे पत्रकार आशिष कुमार कटियार यांनी मोहम्मद जुबेर यांच्या विरोधात लखीमपूर खिरी पोलिसांत 2021 तक्रार दाखल केली होती.

जुबेरने अफवा पसरवल्याचा आरोप - आशिष कटियार यांनी आरोप केला होता की, मोहम्मद जुबेर यांनी सुदर्शन न्यूजवर दाखविण्यात आलेल्या बातमीत तोडफोड करीत ट्विटरवर इंडियाच्या मदतीने प्रसारीत करून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशभरात तणाव निर्माण झाला होता. देशात गृहयुद्ध सुरू करण्याचा जुबेर यांचा विचार असल्याचा आरोपही कटियार यांनी केला होता. या प्रकरणी जबेर यांना 11 जुलैला न्यायालयात हजर व्हावे लागेल, असे पोलिस अधिक्षक संजीव सुमन यांनी सांगितले.

हेही वाचा - Arjun khotkar : अर्जुन खोतकर शिवसेना उपनेते, विजय नाहटा, विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.