ETV Bharat / bharat

रेमडेसिवीरचा १६ मे रोजीपर्यंत देशात पुरेसा पुरवठा करणार- सदानंद गौडा - सदानंद गौडा न्यूज

दर महिन्याला रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवून १.०३ कोटी करण्यात आले आहे. त्यापूर्वी दर महिन्याला ३८ लाख रेमडेसिवीरचे उत्पादन घेण्यात होते, अशी माहिती केंद्रीय रसायने मंत्री सदानंद गौडा यांनी दिली.

remdesivir
रेमडेसिवीर पुरवठा
author img

By

Published : May 7, 2021, 6:43 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी देशात रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रसायन व खत मंत्री सदानंद गौडा यांनी माहिती दिली. हा पुरवठा देशातील राज्यांना १६ मे रोजीपर्यंत करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.

दर महिन्याला रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवून १.०३ कोटी करण्यात आले आहे. त्यापूर्वी दर महिन्याला ३८ लाख रेमडेसिवीरचे उत्पादन घेण्यात होते, अशी माहिती केंद्रीय रसायने मंत्री सदानंद गौडा यांनी दिली.

सदानंद गौडा यांनी ट्विट करून रेमडेसिवीरच्या पुरठ्याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की प्रत्येक राज्याची गरज लक्षात घेता रेमडेसिवीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार आहे. तर त्याच्या वाटपाची तरतूद ही १६ मे रोजीपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात रेमडेसिवीरचा सुरळित पुरवठा होईल, असा त्यांनी विश्वासही व्यक्त केला.

हेही वाचा-कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मागितले तब्बल एक लाख रुपये

१६ मे पर्यंतच्या रेमडेसिवीरच्या वाटपाचे नियोजन

केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटमध्ये औषध मंत्रालयाचे सचिव नवदीप रिनवा व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक राजीव वाधवान यांचे पत्रही जोडले आहे. त्यामध्ये २१ एप्रिल ते १६ मे पर्यंतच्या रेमडेसिवीरच्या वाटपाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा-मोदींचा फोन म्हणजे केवळ 'मन की बात'; झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांची टीका

राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी तातडीने ऑर्ड काढावी-

राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी रेमडेसिवीरसाठी मार्केटिंग कंपन्यांना पुरेशा प्रमाणात तातडीने ऑर्डर काढावी, असा सल्लाही केंद्रीय मंत्र्यांनी दिला. देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने रेमडेसिवीरचे उत्पादन शुल्क, घटक द्रव्य आणि इतर कच्च्या मालांवरील आयात शुल्क माफ केले आहे. रेमडेसिवीरची मागणी वाढलेली पाहता केंद्र सरकारने ११ एप्रिलला रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.