ETV Bharat / bharat

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन : सर्व राज्यांनी मातृभाषेला प्राधान्य द्यावे - व्यंकय्या नायडू

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आज साजरा केला जात आहे. सर्व राज्यांनी त्यांच्या मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच आपल्या मातृभाषेचे रक्षण आणि जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले.

व्यंकय्या नायडू
VICE PRESIDENT
author img

By

Published : Feb 21, 2021, 4:12 PM IST

हैदराबाद - आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात आयोजीत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कार्यक्रमाला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संबोधीत केले. सर्व राज्यांनी त्यांच्या मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी तेलंगाणाचे गृहमंत्री महमूद अली उपस्थित होते.

सर्व राज्यांनी प्रशासकीय कामकाज मातृभाषेत केले पाहिजे. तसेच प्राथमिक शिक्षणही मातृभाषेत घेतलं पाहिजे. तसेच न्यायालयात मातृभाषेत निर्णय सुनावणी झाली. तर ते जास्त चांगल आहे. यातून लोकांना चांगल्या सेवा देण्यास वाव आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या मातृभाषेचे रक्षण आणि जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन -

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी 21 साजरा केला जातो. 17 नोव्हेंबर 1900 ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.शांतता, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी 2000 पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा करण्यात येत आहे. भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.