ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरुन वादळी होण्याची शक्यता - दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. पावसाळी अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बैठक बोलावली होती. सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांनी मणिपूर हिंसाचार, यूसीसी, महागाई आणि उत्तर भारतातील भीषण पूर यांसह अनेक मुद्दे उपस्थित केले. लोकसभेत पावसाळी अधिवेशनात इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 19, 2023, 5:43 PM IST

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नियमांनुसार परवानगी असलेल्या आणि सभापतींनी मंजूर केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली.

पावसाळी अधिवेशनात गाजणारे मुद्दे - यंदाच्या विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजप आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु केल्या आहेत. अशा स्थितीत संसदेचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मणिपूर हिंसाचार प्रकरणावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, शिवाय महागाई आणि तपास यंत्रणांचा गैरवापर या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरतील अशीही शक्यता आहे.

विरोधी पक्षांना पावसाळी अधिवेशनात मुद्दे मांडण्याची परवानगी द्या - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी

चर्चेसाठी सरकार तयार - मिळालेल्या माहितीनुसार, 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नियमांनुसार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहे.

  • #WATCH | Ahead of Monsoon Session of Parliament, Leader of Congress in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury says, "...The first demand of our party is for the PM to give a statement in the House on the Manipur issue and give us the opportunity to discuss it. Tomorrow, we want to… pic.twitter.com/HBgjeLARoV

    — ANI (@ANI) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्वपक्षी नेत्यांची हजेरी - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह काँग्रेसचे खासदार जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी संसदेच्या ग्रंथालय भवनात झालेल्या बैठकीला उपस्थित होते. आम आदमी पक्षाचे संजय सिंह, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल या बैठकीत सहभागी झाले होते.

हेही वाचा - NDA Meeting in Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग- प्रफुल्ल पटेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.