नवी दिल्ली - केंद्र सरकार आरक्षणाबाबचे दुरुस्ती विधेयक ससंदेमध्ये सादर करणार आहे. या विधेयकाला सर्व विरोधी पक्ष पाठिंबा देणार आहे.
आरक्षणाबाबतच्या दुरुस्तीला सर्व विरोधक पाठिंबा देणार असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा-आसाम-मिझोराम सीमा प्रश्नासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री आज मोदींची भेट घेणार
127 वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणासाठी महत्त्वाची
127 व्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे नव्या प्रवर्गांचा एसईबीसीच्या यादीत समावेश करण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे राज्यांना दिले जाणार आहेत. हे अधिकार नसल्याने मराठा आरक्षण रद्द झालेले आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर एसईबीसीच्या यादीत नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचे अधिकार राज्यांना नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
हेही वाचा-PM-Kisan Scheme: किसान सन्मान निधीच्या पुढच्या हफ्त्याचं आज लाभार्थ्यांना वाटप