ETV Bharat / bharat

Eleven Terrorists Arrested : आसाममध्ये अल-कायदाशी संबंधित अकरा दहशतवाद्यांना अटक

author img

By

Published : Jul 29, 2022, 7:13 AM IST

Updated : Jul 29, 2022, 10:38 AM IST

आसाममध्ये अल-कायदाशी संबंधित ( Al Qaeda linked terrorists ) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात ( terrorists nabbed in Assam ) आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली- अलकायदा ही भारतात सक्रीय होत असल्याचे चित्र समोर येत आहे. आसाममध्ये अल-कायदाशी संबंधित ( Al Qaeda linked terrorists ) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात ( terrorists nabbed in Assam ) आली आहे.

  • Eight persons have been arrested by Barpeta Police for links with AQIS/ABT. Case registered at Barpeta Police Station, Sections 17/18/18(B)/19/20 UA(P) Act, 1967: Special DGP L&O, Border, Director V&AC & Chief Anti-Rhino Poaching Task Force, Assam pic.twitter.com/N9I6cARher

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली होती. अल कायदाने 6 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात धमकी दिली आहे की ते गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले करण्यास तयार आहेत. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अल कायदाने ही धमकी दिली आहे. "पैगंबरांच्या सन्मानासाठी लढण्यासाठी" दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याचे अल कायदाने म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार करू, असे अल कायदाच्या पत्रात म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणार्‍यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधू... भगव्या दहशतवाद्यांना आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांच्या अंताची वाट पहावी लागेल. असाही त्यात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या 11 दहशतवाद्यांची अटक करण्यात आली आहे.

दहशतवादी संघटनांच्या नजरा भारतावर - अल कायदाची उपशाखा आणि अफगाणिस्तानात कार्यरत असलेली दहशतवादी संघटना AQIS च्या नजरा भारतावर आहेत. संयुक्त राष्ट्राने आपल्या ताज्या अहवालात इशारा दिला होती की, AQIS ने मार्च 2020 मध्ये आपल्या मासिकाचे नाव 'नवा-ए-अफगाण जिहाद' वरून बदलून 'नवा-ए-गझवा-ए-हिंद' केले होते. दहशतवादी संघटना भारतात कारवाया वाढवत असल्याचे यावरून दिसून येते. UN च्या प्रतिबंध मॉनिटरिंग अँड अॅनालिसिस टीमच्या 13व्या अहवालानुसार, AQIS अफगाणिस्तानमध्ये ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे. त्यात 180 ते 400 दहशतवादी आहेत. त्यात भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानचे नागरिक आहेत. हे दहशतवादी गट गझनी, हेलमंड, कंदाहार, निमरुज, पक्तिका, जाबुल या राज्यांमध्ये आहेत. ऑक्टोबर 2015 मध्ये कंदाहारमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त ऑपरेशननंतर ते कमकुवत झाले, परंतु संपले नाहीत. आता आर्थिक मदत मिळणेही त्यांच्या अडचणी वाढले आहे. त्यामुळेच तो आक्रमक वृत्ती दाखवू शकत नाही.

भारताप्रती आक्रमक विचारसरणी - गझवा-ए-हिंद मासिकाच्या नावात समाविष्ट करण्यात आलेले दहशतवादी आणि कट्टरपंथी गटांची भारताप्रती आक्रमक विचारसरणी दिसते. भारतीय उपखंडात मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यात मोठे युद्ध होईल, असा इस्लामिक कट्टरतावादी गटांचा विश्वास आहे. यात मुस्लिम जिंकतील आणि संपूर्ण उपखंड काबीज करतील. पाकिस्तानातील बहुतांश दहशतवादी नेते आणि धार्मिक नेते गझवा-ए-हिंदचा हवाला देऊन मुस्लिमांचा भारताविरुद्धच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा-Limbo Skating Record : पुण्यातील सात वर्षीय देशना नहारने चीनचा विश्वविक्रम मोडला; लिंबो स्केटिंगमध्ये कोरले गिनीज बुकमध्ये नाव

हेही वाचा-Jayant Patil on Shinde Government : सरकारला ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही - जयंत पाटील

हेही वाचा-दिल्ली मुंबईसह गुजरातमध्ये अल-कायदाची आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी

Last Updated : Jul 29, 2022, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.