हैदराबाद : साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहुर्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेला नागरिक मोठ्या प्रमाणात गाड्यांची आणि सोन्याची खरेदी करतात. साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त असल्यामुळे हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्वाचा सण मानले जाते. त्यामुळे जाणून घेऊ कधी आहे यावर्षाची अक्षय तृतीया, कधी आहे पूजा विधीचा मुहुर्त याबाबतची सविस्तर माहिती.
काय आहे अक्षय तृतीयेचा इतिहास : पांडवांना अज्ञावासाची शिक्षा झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक अक्षय पात्र दिले होते. हे पात्र कधीही रिकामे राहत नसल्याने त्यात सतत अन्न राहत होते. त्यामुळे पांडवांना कधीही अन्नाची गरज पडली नाही. श्रीकृष्णांनी पांडवाना अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले जप, ज्ञान, दानामुळे अक्षय फळप्राती मिळत असल्याचे सांगितले जाते. म्हणून या मुहुर्ताला अक्षय तृतीया असे म्हणतात. हिंदू धर्मात असलेल्या भविष्यपुराण, मत्सपुराण, पद्यपुराण, विष्णूधर्मोत्तर पुराण आणि स्कंदपुराणात अक्षय तृतीयेचा विशेष उल्लेख आढळतो. अक्षय तृतीयेला केलेल्या शूभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळत असल्यामुळे या दिवशी देवांसह पित्रांचे पूजन करण्यात येते. भगवान विष्णू यांना वैशाख महिना विशेष प्रिय असल्याने अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची या दिवशी पूजा करण्यात येते.
काय आहे अक्षय तृतीयेची आख्यायिका : हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाने अक्षय तृतीयेचे महत्व नमूद केल्याचा उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठराला अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने त्याचा कधीच नाश होत नसल्याचे स्पष्ट करतात. या दिवशी केलेल्या हवनाचा कधीही नाश होत नसल्याने ऋषी मुनी या दिवसाला अक्षय तृतीया म्हणत असल्याचेीह भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठराला केलेल्या उपदेशात नमूद करण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवासह पितरांची कृपा मिळवण्यासाठी करण्यात आलेले काम हे अक्षय असल्याचे भगवान श्रीकृष्णाने नमूद केले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुर्योदयाच्या वेळी अभ्यंगस्नान करुन भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती होत असल्याचेही त्यांनी नमूद केल्याची अख्यायिका पुराणात सांगितली जाते. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजाविधी करण्यात येते. अक्षय तृतीयेला गुळ आणि कापुरासोबत जलदान केल्याने विशेष पुण्यप्राप्त होत असल्याची आख्यायिका भविष्यपुराणातील मध्यम पर्वात कथन करण्यात आली आहे.
कधी आहे अक्षय तृतीया आणि पूजेचा मुहुर्त : यावर्षी अक्षय तृतीया 22 एप्रिल शनिवारला येत आहे. त्यामुळे नागरिक आतापासूनच अक्षय तृतीयेची तयारी करत आहेत. अक्षय तृतीयेला विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यावर्षी अक्षय तृतीयेच्या पूजेची वेळ सकाळी 7 वाजून 48 मिनीटांपासून सुरू होऊन तो रविवारी सकाळी 7 वाजून 48 मिनीटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत अक्षय तृतीयेची पूजा करु शकता.
हेही वाचा - Gujarat Top Street Food : जगभरात पसरले आहेत गुजरातचे खाद्यपदार्थ, जाणून घ्या गुजरातच्या टॉप स्ट्रीट फूडची माहिती