हैदराबाद - 'सॉरी' हा सर्वात लहान शब्द आहे, ज्याला बोलण्यासाठी सर्वात जास्त शक्ती लागते असे म्हटले जाते. मग तुम्ही बॉलीवूड स्टार असाल आणि करोडो रुपये पणाला लावले तर ते आणखी कठीण होऊन बसते. मात्र, खिलाडींचा खिलाडी अक्षय कुमारने 'सॉरी' म्हणत चाहत्यांची माफी मागितली आहे. ( Akshay Kumar On Vimal advertisement ) नुकताच अभिनेता अक्षय कुमारने 'विमल'ची एक जाहिरात केली. कंपनीच्या विमल इलायची ब्रँडसाठी अजय देवगण आणि शाहरुख खानसह अक्षय कुमार असलेली जाहिरात प्रसारित झाली. त्यानंतर तो चांगलाच ट्रोल झाला. त्यानंतर त्याने सर्वांची माफी मागितली आहे.
- — Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
">— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
अशा गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही - या जाहिरातीनंतर निरोगी जीवनशैलीने लोकांना प्रेरित करणारा अक्षय कुमार चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियावर मीम्स बनवले जाऊ लागले. चाहत्यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अक्षयने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की, तो सिगारेट पीत नाही किंवा त्याने कधी दारूला हातही लावला नाही. तो कोणत्याही प्रकारची मादक द्रव्ये घेत नाही आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही, असे अनेकवेळा सांगताना दिसला आहे.
चाहत्यांची माफीही मागितली आहे - हे सगळे जाही सांगत असताना मग गुटखा-पान मसाला बनवणाऱ्या 'विमल' या कंपनीची कसकाय करतो असे म्हणत चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. आता अक्षय कुमारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे की, त्याने गुटखा-पान मसाला बनवणाऱ्या 'विमल' या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. यासोबतच त्याने चाहत्यांची माफीही मागितली आहे.
मी तुमचे कधीही न संपणारे प्रेम आणि आशीर्वाद इच्छितो - अक्षय कुमारने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, मला माफ करा. मला माझ्या सर्व प्रियजनांची आणि शुभचिंतकांची माफी मागायची आहे. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियेने मला खूप प्रभावित केले आहे. जरी मी तंबाखूचे कधीही समर्थन केले नाही आणि कधीही करणार नाही, तरीही विमल इलायची यांच्याशी असलेल्या माझ्या सहवासाबद्दल मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मी हाय जाहीरात करारातून नम्रतेने माघार घेत आहे असही तो म्हणाला आहे. कराराच्या कायदेशीर कालावधीपर्यंत ब्रँड माझी जाहिरात ऑन एअर ठेवू शकतो. पण मी वचन देतो की मी भविष्यातील निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेईन. त्या बदल्यात, मी तुमचे कधीही न संपणारे प्रेम आणि आशीर्वाद इच्छितो असही तो यामध्ये म्हणाला आहे.
चाहते पुन्हा त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत - मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार याआधीही गुटखा-पान मसाला बनवणाऱ्या 'विमल' या कंपनीची जाहिरात करण्यास तयार नव्हता. मात्र, मोठ्या रकमेची ऑफर आल्यानंतर त्याने कराराला होकार दिला. यामुळे त्याचे चाहते चिडतील याची अक्षयलाही कल्पना होती. मात्र, प्रकरण इतके पुढे जाईल याची कल्पनाही त्याने केली नव्हती. मात्र, आता त्याने स्वतः या कंपनीतून माघार घेतल्याने चाहते पुन्हा त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा - Saamana Editorial : गाढव तुरुंगात जाताच 'लाल परी' मुक्त! सामनातून सदावर्तेंना फटकारे