ETV Bharat / bharat

'एमआयएम तर भाजपाची टीम बी, बंगालमध्ये प्रभाव पडणार नाही' - एमआयएम पक्ष बंगाल विधानसभा

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपा डावपेच खेळत असतानाच एमआयएम पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jan 22, 2021, 7:51 AM IST

कोलकाता - बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपा डावपेच खेळत असतानाच एमआयएम पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद येथील बैठकीत एमआयएम पक्षावर वक्तव्य केले. असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष बंगालमध्ये जास्त प्रभाव पाडू शकणार नाही, कारण हा पक्ष भाजपाची टीम बी असल्याचे, वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

एमआयएम भाजपाची बी टीम -

एमआयएम पक्ष भाजपाची 'बी टीम' असल्याचे बिहार निवडणुकीत उघडे पडले आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीत एमआएम पक्ष जास्त प्रभावी ठरणार नाही, असे त्या म्हणाल्या. मुर्शिदाबाद येथे तृणमूल काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपा आणि अन्य विभाजनावादी शक्तींविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन त्यांनी पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना केले.

मुर्शिदाबाद जिल्ह्यात २२ विधानसभा जागा असून येथे जास्त जागा निवडूण आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतेच बंगालचा दौरा करत पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या. बिहार निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळाल्यानंतर बंगाल विधानसभेच्या रिंगणात उतरत असल्याचे ओवैसी यांनी जाहीर केले होते.

नंदीग्राम मतदार संघातून ममता बॅनर्जी उभ्या राहणार -

ममता बॅनर्जी यांनी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा शंख फुंकला. यावेळी त्यांनी आपण नंदीग्राम मतदरासंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून २०१६ मध्ये सुवेंदू अधिकारी हे तृणमूलच्या तिकीटावरुन निवडून आले होते. मात्र, आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सुवेंदू अधिकारी आणि ममता यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सुवेंदू अधिकारी नंदीग्राममधून निवडणुकीला उभे राहणार असल्याची घोषणा होताच ममता बॅनर्जी यांनी तेथून उभे राहण्याची घोषणा केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.