देहरादून : उत्तराखंड हे राज्य पहाडासाठी सुप्रसिद्ध आहे. मात्र त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय सेवा देणे शक्य होत नाही. यासाठी ऋषिकेश येथील एम्सने ड्रोन कंपनीसोबत करार करुन पहाडी परिसरात औषधी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. एम्सच्या प्राध्यापक मीनू सिंह आणि ड्रोन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नवी टिहरी येथील रुग्णांना 29 मिनीटांमध्ये 3 किलो औषधी पोहोचवली आहे. डोंगरी परिसरात वैद्यकीय सेवा आणि औषधी देणार ऋषीकेश हे पहिले एम्स ठरले आहे.
ड्रोनने औषधी पाठवण्याचा झाला शुभारंभ : उत्तराखंड हे पहाडांनी वेढलेले राज्य आहे. या राज्यातील दुर्गण परिसरातील रुग्णांना वेळेवर औषधी पुरवण्यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे आज ऋषिकेश येथील एम्सने ड्रोनने दुर्गम भागात औषधे पोहोचवण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. एम्सच्या संचालक प्राध्यापक मीनू सिंग आणि ड्रोन कंपनीचे अधिकारी गौरव कुमार यांनी औषधी पाठवम्याचा शुभारंभ केला. यावेळी तब्बल तीन किलो औषधांचे पार्सल ड्रोनद्वारे नवी टिहरी येथे पाठवण्यात आले.
ड्रोनने पहिल्याच वेळी पाठवली औषधी : उत्तराखंड राज्यातील दुर्गम परिसरात औषधी पाठवण्यासाठी आतापर्यंत रोडचा अवलंब करण्यात येत होता. मात्र रोडने औषधी पोहोचवण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे. त्यामुळे रुग्णाला उशीरा औषधी मिळत होती. वेळेवर औषधी आणि वैद्यकीय सेवा न मिळाल्याने रुग्णाला जीवही गमावावा लागल्याची शक्यता होती. त्यामुळे ड्रोनने औषधी पाठवल्यास औषधी वेळेवर मिळण्याची शक्यता आहे. त्याची पहिली सुरुवात करण्यात आली आहे. नवी टिहरी येथील दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषधी पाठवून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यापूर्वी उत्तराखंडच्या दुर्गम भागातील परिसरात ट्रायल घेण्यात आल्याची माहिती प्राध्यापक मीनू सिंग यांनी दिली.
80 किलो मिटरपर्यंत ड्रोन करु शकतो उड्डाण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडीयाची सुरुवात केली आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ऋषीकेश येथील एम्स सातत्याने प्रयत्न करत आहे. दुर्गम पहाडी परिसरात औषधी आणि वैद्यकीय सेवा पोहेचवण्यासाठी एम्स प्रयत्न करत आहे. त्याला यश आल्याची माहिती प्राध्यापक मीनू सिंग यांनी दिली. आता ड्रोनद्वारे राज्यातील कोणत्याही दुर्गम परिसरात औषधी पोहोचवली जाऊ शकत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर ड्रोन तब्बल 80 किलोमिटर परिसरात औषधी पोहोचवणार असल्याची माहिती टेक्निकल टीमचे गौरव कुमार यांनी सांगितले आहे. सध्या डोंगरी परिसरातील 42 किलोमिटरचे उड्डाण ड्रोनने केल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - Adani Group Share Price: अदानी समूहाला काहीसा दिलासा... शेअर्सच्या किमती वधारल्या