ETV Bharat / bharat

दिल्ली सीमेवर हजारो शेतकऱ्यांचा मुक्काम, चपात्या बनवण्यासाठी यंत्रांचा वापर - टिकरी सीमा शेतकरी आंदोलन

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी दिल्ली सीमेवरील आंदोलनाचे वार्तांकन करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी चपात्या तयार करणारी यंत्रे दिसून आली. हे मशीन तासाला सुमारे ९०० चपात्या तयार करू शकते. त्यामुळे जेवण जलद तयार करणे शक्य झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 6, 2020, 5:37 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर मागील दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पास केलेले तीन कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. येथील सर्व शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था एक मोठं आव्हान आहे. यावर उपाय म्हणून आता चपाती तयार करण्याची यंत्रे आंदोलन स्थळी आणण्यात आली आहेत.

जेवण जलद बनविण्याची सोय

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी दिल्ली सीमेवरील आंदोलनाचे वार्तांकन करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी चपाती तयार करणारी यंत्रे दिसून आली. हे मशीन तासाला सुमारे ९०० चपात्या तयार करू शकते. त्यामुळे जेवण जलद तयार करणे शक्य झाले आहे. हजारो आंदोलकांना जेवण पुरवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली आहे. पंजाब हरयाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी बरोबर येताना ट्रक आणि टेम्पोमधून धान्य सोबत आणले आहे.

वर्षभर पूरेल इतके धान्य बरोबर

कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यांच्या कडेला झोपत आहे. यामध्ये अनेक वयोवृद्ध शेतकरी तसेच बालकेसुद्धा आहेत. थंडीमुळे त्यांच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आंदोलकांनी घरी जावे, सरकार चर्चा करून मार्ग काढेल, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

सुमारे वर्षभर पुरेल इतके धान्य बरोबर आणल्याचे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले आहे. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार शेतकरी आणि नेत्यांनी व्यक्त केला आहे. ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.