ETV Bharat / bharat

PM Modi Congratulated Shehbaz Sharif : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. (PM Modi Congratulated Shehbaz Sharif ) भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास आपण विकास कामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रीत करता येईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शहबाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्या

author img

By

Published : Apr 12, 2022, 10:51 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शहबाझ शरीफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पंतप्रधानांनी दहशतवादमुक्त प्रांत ठेवण्यासाठी दोन्ही देश काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Shahbaz Sharif sworn as prime minister) दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शहबाझ शरीफ यांनी काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

  • Congratulations to H. E. Mian Muhammad Shehbaz Sharif on his election as the Prime Minister of Pakistan. India desires peace and stability in a region free of terror, so that we can focus on our development challenges and ensure the well-being and prosperity of our people.

    — Narendra Modi (@narendramodi) April 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या - काश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले असून, पाकिस्तान त्यांना 'राजनैतिक व नैतिक पाठिंबा' देईल. तसेच, हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करेल, असेही शरीफ म्हणाले आहेत. (Shahbaz Sharif younger brother of Nawaz Sharif) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहबाझ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तत्पुर्वीच त्यांनी आपल्याला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, काश्मीर मुद्दा सुटल्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही असेही ते म्हणाले. राजकीय उलथापालथीनंतर इम्रान खान यांना हटवून पंतप्रधानपदी आलेले ७० वर्षांचे शहबाझ यांनी पंतप्रधान होण्याच्या काही तास आधीच काश्मीरबद्दल वक्तव्य केले होते. दरम्यान, ते पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रक्ताने काश्मीर खोरे लाल झाले आहे - शाहबाज यांनी काश्मीर मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे यावे, जेणेकरून दोन्ही देश सीमेच्या दोन्ही बाजूंला असलेल्या गरिबी, बेरोजगारी, औषधटंचाई आणि इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील, असेही मत शरीफ यांनी नोंदवले आहे. 'आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत, आपल्याला त्यांच्यासोबत राहावेच लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासून आमचे भारतासोबतचे संबंध दुर्दैवाने कधीही चांगले राहिलेले नाहीत. ऑगस्ट (२०१९)मध्ये भारताने अनुच्छेद ३७० रद्द केला तेव्हा इम्रान खान यांनी गंभीर व राजनैतिक प्रयत्न केले नाहीत. काश्मिरी लोकांचे रक्त काश्मीरच्या रस्त्यांवर वाहात असून त्यांच्या रक्ताने काश्मीर खोरे लाल झाले आहे”, असही शहबाझ शरीफ म्हणाले.

हेही वाचा - PNB Fraud Case : नीरव मोदीच्या जवळच्या व्यक्तीला इजिप्तमध्ये अटक; सीबीआयची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.