ETV Bharat / bharat

National Highway 48 : गुजरातमध्ये रस्त्यांची लागली वाट.. मुसळधार पावसानंतर नॅशनल हायवेवर पडले खड्डेच खड्डे - गुजरातमध्ये मुसळधार पाऊस

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले ( heavy rains in Gujarat ) आहे. वापी-सिल्वासा राष्ट्रीय महामार्ग-48 वर पाणी साचल्याने खड्डे भरले ( NH 48 covered in potholes filled with water ) आहेत.

National Highway-48 covered in potholes filled with water
मोठे खड्डे असल्याने वाहने चालविताना कसरत होत आहे.
author img

By

Published : Jul 17, 2022, 3:03 PM IST

अहमदाबाद ( गुजरात ) : दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू ( heavy rains in Gujarat ) आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांचीच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाचीही मोठी दुर्दशा झाली आहे. मुसळधार पावसामुळे वापी-सिल्वासा राष्ट्रीय महामार्ग-48 वर मोठमोठे खड्डे पडले ( NH 48 covered in potholes filled with water ) आहेत. गुजरातमधील पावसाने प्रभावित भागातून किमान 1,300 लोकांना वाचविण्यात आले आहे. त्यापैकी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून एका दिवसात 811 लोकांना वाचवण्यात आले आहे.

National Highway-48 covered in potholes filled with water
मुसळधार पावसानंतर नॅशनल हायवेवर पडले खड्डेच खड्डे

स्वच्छतेला झाली सुरुवात : शनिवारी बचावकार्य राबविण्यात आले. या कारवाईत तटरक्षक दल, एनडीआरएफ आणि स्थानिक जलतरणपटूंनी रात्रभर परिश्रम घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. नवसारीत एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. आणखी टीम्स स्टँडबायवर आहेत आणि केंद्राशी समन्वय सुरू आहे. सुरत महानगरपालिकेच्या 200 कामगारांच्या पथकाने 'ऑपरेशन निरामय' अंतर्गत नवसारी जिल्ह्यात सहा जेसीबी, पाच डिवॉटरिंग पंप, टिप्पर ट्रक, 47 हून अधिक गोल्फ मशीन साफसफाई, गाळ काढणे आणि औषध फवारणीसाठी तैनात केले आहेत.

वाहनचालकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे

धरणांमध्ये पाणीसाठा वाढला : याशिवाय नवसारी जिल्ह्यातील बाधित भागात या आजाराच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी 40 आरोग्य पथकेही तैनात करण्यात आली आहेत. 14,900 लोकांना पावसाने प्रभावित भागातून सुरक्षित स्थळी हलवले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील 207 जलाशयांमध्ये शनिवारपर्यंत 50.92 टक्के पाणीसाठा होता. राज्यातील जीवनदायी सरदार सरोवर धरणात 1,69,139 MCFT म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या 50.63 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या फ्लड सेलकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यातील 206 जलाशयांमध्ये 3,02,397 MCFT म्हणजेच एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 54.18 टक्के जलसाठा पुनर्संचयित झाला आहे.

रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा : Video : पुराच्या पाण्यात अडकले होते लोकं.. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाने वाचवले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.