ETV Bharat / bharat

Aero India 2021 : 'एरो इंडिया' इंटरनॅशनल प्रदर्शनाला बंगळुरुत सुरुवात - एरो इंडिया

कर्नाटकची राजनाधी बंगळुरू येथे 'एरो इंडिया' प्रदर्शनाला सुरूवात झाली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील खासगी आणि सरकारी कंपन्यांसह परदेशी कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

एरो इंडिया
एरो इंडिया
author img

By

Published : Feb 3, 2021, 11:56 AM IST

बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू येथे 'एरो इंडिया २०२१' प्रदर्शनाला सुरूवात झाली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील खासगी आणि सरकारी कंपन्यांसह परदेशी कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनाद्वारे आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यात येत आहे. अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील देशी तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत तिन्ही दलाचे सेनाप्रमुख उपस्थित होते.

एरो इंडिया इंटरनॅशनल प्रदर्शनाला बंगळुरात सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष सहभाग घेत प्रदर्शन पार पडणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचे हे तेरावे वर्ष आहे. बंगळुरूमधील हवाई दलाच्या येलाहंका विमानतळावर हे प्रदर्शन सुरू आहे. यावेळी विमानांचा 'एअर शो' सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ६०१ कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. यात १०० पेक्षा जास्त परदेशी कंनन्यांनी सहभाग घेतला आहे. तंत्रज्ञान विकासाबरोबरच अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यासाठी या प्रदर्शनाद्वारे मदत होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ या प्रदर्शनात त्यांनी विकसित केलेल्या उपकरणांचे प्रदर्शन मांडणार आहे.

एरो इंडिया इंटरनॅशनल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.