ETV Bharat / bharat

Declaration 2023 G20 : जी २० शिखर परिषदेतील घोषणांना पंतप्रधान मोदींनी दिली स्वीकृती - जी २० शिखर परिषदेतील घोषणा

Declaration 2023 G20 : नवी दिल्लीत जी-२० नेत्यांची परिषद सुरू आहे. या (G20) नेत्यांच्या शिखर परिषदेतील घोषणांना पंतप्रधान मोदींनी स्वीकृती दिली आहे. याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

declaration 2023 G20
declaration 2023 G20
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 5:11 PM IST

Updated : Sep 9, 2023, 5:16 PM IST

नवी दिल्ली Declaration 2023 G20 : नवी दिल्लीमध्ये सध्या जी-२० देशांची शिखर परिषद सुरू आहे. भारताकडे या संघटनेचं सध्या अध्यक्षपद आहे. या परिषदेमध्ये एक सामूहिक प्रस्तावांना मान्यता देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष या नात्याने आज नवी दिल्ली G20 नेत्यांच्या शिखर घोषणेवर एकमत झाले असल्याचं स्पष्ट केलं. तसंच हे प्रस्ताव स्वीकारल्याची घोषणा केली आहे.

  • #WATCH | G-20 in India: PM Narendra Modi says, " I have received good news. Due to the hard work of our team, consensus has been built on New Delhi G20 Leaders' Summit Declaration. My proposal is to adopt this leadership declaration. I announce to adopt this declaration. On this… pic.twitter.com/7mfuzP0qz9

    — ANI (@ANI) September 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

G20 नेत्यांच्या शिखर घोषणेवर एकमत - G20 सत्राचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पंतप्रधानांनी या घोषणापत्रासाठी केलेल्या कामगिरीसाठी सर्वच मंत्री आणि इतर संबंधितांचं अभिनंदन केलं. जी-२० सारख्या मोठ्या प्रमाणावरील देशांच्या विचारांचं एकमत होणं खूप जिकीरीचं त्याचवेळी गरजेचं असतं. त्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांना खूप काळजीपूर्वक त्याचा मसूदा तयार करावा लागतो. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, "मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमच्या कार्यसंघाच्या कठोर परिश्रमामुळे, नवी दिल्ली G20 नेत्यांच्या शिखर घोषणेवर एकमत झालं आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अध्यक्ष या नात्यानं आपल्याकडे आला आहे. तसंच हे घोषणापत्र स्वीकारण्याची घोषणा आपण करत आहे. या प्रसंगी मी, माझे यासाठीचे सर्व सहकारी, मंत्र्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं."

घोषणापत्राचा स्वीकार - जी-२० संघटनेच्या प्रथेप्रमाणं हे घोषणापत्र पंतप्रधान मोदींंच्याकडे बैठकीमध्ये सोपवण्यात आलं. त्यानंतर या घोषणापत्राचा स्वीकार केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी प्रथेप्रमाणे डेस्कवर हातोडा आपटून केली. शिखर परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान म्हणाले की, २१ वे शतक हे संपूर्ण जगाला नवी दिशा देण्याची क्षमता असलेला काळ आहे. “हा असा काळ आहे जेव्हा वर्षानुवर्षे जुनी आव्हाने पेलताना त्यावर नवीन उपाय योजना करण्याची गरज आणि मागणी करतात. अशा परिस्थितीत केवळ तंत्रज्ञानाचा सरसकट अवलंब न करता ही आव्हानं मानवकेंद्रित दृष्टीकोनातून पार करुन पुढे जाण्याची गरज आहे.

वसुधैव कुटुंबकम् - रताकडे जी-२० परिषदेचं अध्यक्षपद आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये सर्वत्र जगभरातील महत्वाच्या नेत्यांचा वावर गेल्या दोन दिवसांपासून आहे. जगभरातील नेत्यांचं स्वागत तसंच विविध बैठकांच्या माध्यमातून मानव कल्याणाच्या दृष्टीनं विचार विमर्ष होत आहे. पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी या बैठकीच्या निमित्तानं वसुधैव कुटुंबकम् ची घोषणा दिली आहे.

हेही वाचा..

  1. Ghangli Musician Sonu Mhase : जव्हारमधील सोनू म्हसे यांचा जी 20 परिषदेत घांगळी वादक म्हणून सहभाग, वाचा घांगळी आहे तरी काय...
  2. G20 Summit : पंतप्रधान मोदींनी जी २० परिषदेत दिला 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र
  3. Rishi Sunak India Visit : भारतात पोहोचताच 'देसी' स्टाईलमध्ये दिसले ऋषी सुनक

Last Updated : Sep 9, 2023, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.