ETV Bharat / bharat

Aditya L१ Launch : अखेर अवकाशात झेपावलं 'आदित्य एल १'; 'या' ठिकाणावरुन करणार सूर्याचा अभ्यास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 7:39 AM IST

Updated : Sep 2, 2023, 12:23 PM IST

Aditya L1 : चंद्रयान ३ चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग केल्यानंतर इस्रोनं आता आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. देशाचं पहिलं सौर मिशन 'आदित्य एल १' चं यशस्वी लॉंचिंग झालंय. आता 'आदित्य एल १' हे यान पृथ्वी आणि सूर्यामधील 'लॅग्रेंज पॉइंट १' या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास करेल.

Aditya L1
आदित्य एल १

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : Aditya L1 : देशाचं पहिलं सौर मिशन 'आदित्य एल १' चं शनिवारी सकाळी ११.५० ला यशस्वी प्रक्षेपण झालं. 'आदित्य एल १' इस्रोच्या 'पीएसएलव्ही' अंतराळयानातून अवकाशात झेपावलं. आता ते 'लॅग्रेंज पॉइंट १' या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास करेल. त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लक्ष किमी अंतरावर स्थित आहे.

  • #WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches India's first solar mission, #AdityaL1 from Satish Dhawan Space Centre in Sriharikota, Andhra Pradesh.

    Aditya L1 is carrying seven different payloads to have a detailed study of the Sun. pic.twitter.com/Eo5bzQi5SO

    — ANI (@ANI) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एल १ का निवडलं : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या सौर वेधशाळेचे प्रमुख एबेनेझर चेलासामी यांनी या पॉइंटबद्दल अधिक माहिती दिली. 'सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित लॅग्रेंज पॉइंट १ वरून सूर्याचं अखंड दृश्य दिसतं. तसंच ते पृथ्वीच्या जवळ असल्यानं, तेथून अंतराळयानाचं दळणवळण सुलभ आहे. इतर बिंदू जसे की, एल ३ आणि एल ४ सूर्याच्या खूप दूर आहेत. तर एल ५ सूर्याच्या मागे आहे. तो आणखी दूर आहे', असं चोलासामी म्हणाले.

लॅग्रेंज बिंदू म्हणजे काय : सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहासाठी किंवा अंतराळातील कोणत्याही दोन वस्तूंसाठी पाच लॅग्रेंज बिंदू आहेत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, इटालियन-फ्रेंच गणितज्ञ-खगोलशास्त्रज्ञ 'जोसेफ लुईस लॅग्रेंज' यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं. अंतराळातील या बिंदूंवर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती एका अवकाशयानाला स्थिर पॅटर्नमध्ये परिभ्रमण करण्यास परवानगी देतात.

एल १ वर सौर आणि हेलिओस्फेरिक वेधशाळा उपग्रह आहे : पृथ्वीपासून सूर्यापर्यंत एल १, एल २, एल ३, एल ४ आणि एल ५ ही स्थानं आहेत. यातील पहिले तीन सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत आहेत. परंतु, एल ३ हा नेहमी सूर्याच्या मागे लपलेला असतो. त्यामुळे त्याचा विचार केला जात नाही. एल २ पृथ्वीच्या मागे स्थित आहे. सखोल अंतराळ संशोधनासाठी हा बिंदू आदर्श आहे. एल १, जिथं आदित्य पोहोचणार आहे, तिथं आधीच SOHO – सौर आणि हेलिओस्फेरिक वेधशाळा उपग्रह आहे. एल ४ आणि एल ५ स्थिर असले तरी तेथे ट्रोजन नावाच्या लघुग्रहांचा धोका आहे.

अंतराळयानाला प्रवासाला किती दिवस लागतील : आदित्यला १५ लाख किमी अंतरावरील एल १ पर्यंत पोहोचण्यासाठी १०९ ते १२० दिवस लागतील. या दरम्यान त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. येथं ४०,००० किमी वेगानं २० दिवसात पोहोचता येतं. मात्र त्यासाठी अधिक इंधन लागेल. शिवाय, इतक्या वेगाने पुढे गेल्यानंतर अवकाशयान इच्छित ठिकाणी तैनात करण्यासाठी तेवढीच प्रतिकारक शक्ती देखील आवश्यक असते.

हेही वाचा :

  1. Aditya L1 : आदित्य एल-१ चं काउंटडाऊन सुरू; सूर्याच्या दिशेनं घेणार झेप

Last Updated : Sep 2, 2023, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.