ETV Bharat / bharat

Aditya L1 : आदित्य एल-१ चं काउंटडाऊन सुरू; सूर्याच्या दिशेनं घेणार झेप - Aditya L1 launch Vehicle

Aditya L1 : चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर, भारताची नजर आता सूर्याकडं आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं की, आदित्य एल-१ मिशन शनिवारी सकाळी ११.५० वाजता प्रक्षेपित केलं जाईल (aditya l1 launch date). त्यामुळं सूर्याची अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे.(Aditya-L1 launch date ISRO)

Aditya L1
आदित्य एल -1
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 7:52 PM IST

नवी दिल्ली Aditya L1 : भारताच्या आदित्य एल 1च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती आजपासून सुरू झालीय. शनिवारी सकाळी ११.५० मिनिटानी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल १चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या संदर्भात ISRO नं 'X',वर (पूर्वीचं Twitter) अपडेटमध्ये म्हटलं आहे की, 'PSLV-C57/Aditya-L1 मिशनचं प्रक्षेपणासाठी काउंटडाऊन सुरू झालं आहे.' इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, या मोहिमेला सूर्याच्या कक्षेत जाण्यासाठी 125 दिवसांचा कालावधी लागेल.

PSLV-C57 सात पेलोड वाहून नेणार : आदित्य-एल१ ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. PSLV-C57 द्वारे श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रावरुन याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सात पेलोड्स यावेळी अवकाशात झेपवणार आहेत. त्यापैकी चार सूर्याच्या प्रकाशाचं निरीक्षण करतील. इतर तीन प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे पॅरामीटर्स मोजतील. (Aditya L1 launch Vehicle)

इथं होणार कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण : या प्रेक्षपणाचं थेट प्रक्षेपण इस्रो वेबसाइट: https://isro.gov.in, फेसबुक: https://facebook.com/ISRO, Youtube: https://youtube.com/watch?v=_IcgGYZTXQw, डीडी नॅशनल टीव्ही चॅनलवर करण्यात येणार आहे. (aditya l1 launch place)

इस्रो प्रमुख मंदिरात दाखल : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आदित्य-एल१ सौर मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या एक दिवस आधी, शुक्रवारी आंध्र प्रदेशातील सुल्लुरपेटा येथील श्री. चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात पूजा केली. मंदिराच्या पूजाऱ्यानं सांगितलं की, सोमनाथ यांनी सकाळी ७.३० वाजता मंदिरात येऊन देवाची पूजा केली.

ISRO आणखी मोहिमा सुरू करणार : पत्रकारांशी बोलताना इस्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले की, आदित्य-एल१ मिशन शनिवारी सकाळी ११.५० वाजता प्रक्षेपित केलं जाईल. या सौर मोहिमेत सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. आदित्य-एल१ ला अचूक मार्ग गाठण्यासाठी १२५ दिवस लागतील. या मोहिमेनंतर इस्रो येत्या काही दिवसांत SSLV-D3, PSLV यासह इतर अनेक मोहिमा सुरू करणार आहे.

सौर भूकंपांचा अभ्यास : पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी अंतरावर, लॅग्रेंज पॉइंट आहे. तिथंच आदित्य-एल१ सूर्याच्या कक्षेत ठेवले जाईल. मोहिमेबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. आर. रमेश म्हणाले की, ज्याप्रमाणं पृथ्वीवर भूकंप होतात, त्याचप्रमाणं सूर्याच्या पृष्ठभागावरही सौर भूकंप होतात. ज्यांना कोरोनल मास इजेक्शन म्हणतात. या प्रक्रियेत लाखो टन सौर सामग्री आंतरग्रहीय अवकाशात फेकली जाते. युरोपियन स्पेस एजन्सी, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) नं यापूर्वी अशाच प्रकारच्या मोहिमा सुरू केल्या आहेत. परंतु आदित्य एल१ मोहीम त्यांच्यापेक्षा दोन कारणांनी वेगळी असेल. त्याचं कारण आम्ही सौर कोरोनाचं निरीक्षण करणार आहोत. याशिवाय, आपण सौर वातावरणातील चुंबकीय क्षेत्रामध्ये होणारे बदल देखील पाहू शकतो. जे कोरोनल मास इजेक्शन म्हणजेच सौर भूकंपाचं कारण आहे, असं डॉ. आर. रमेश म्हणाले.

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 update : चंद्रावर भूकंप! इस्रोनं नोंदवलं 'कंपनं', प्लाझमाचा अभ्यास सुरू
  2. Super Blue Moon : आकाशात दिसणार 'सुपर ब्लू मून'चं अप्रतिम दृश्य, जाणून घ्या केव्हा आणि कसं पाहता येईल
  3. Aditya L-१ Mission : भारताची सूर्याकडं झेप; आदित्य L-1 अंतराळयान 'या' यारखेला झेपावणार अवकाशात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.