ETV Bharat / bharat

Adi Kailash Yatra News: हिंदू धर्मात आदि कैलाश यात्रेचे काय आहे महत्त्व? खराब हवामानामुळे दोन महिन्यांकरिता यात्रा झाली स्थगित

author img

By

Published : Jul 8, 2023, 1:47 PM IST

आदि कैलास यात्रेला पुन्हा ब्रेक लागला आहे. हवामानाची प्रतिकूल स्थिती पाहता ही यात्रा दोन महिन्यांसाठी थांबविण्यात येणार आहेत. या यात्रेचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे.

Adi Kailash Yatra News
आदि कैलाश यात्रेचे काय आहे महत्त्व

डेहराडून: अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे आदि कैलास यात्रा दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा निर्माण होऊ शकतो. खबरदारी म्हणून कुमाऊं मंडल विकास निगमने आदि कैलास यात्रा दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

कुमाऊ मंडल विकास निगमचे एमडी संदीप तिवारी म्हणाले, की हवामान सामान्य झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कुमाऊं मंडल विकास निगमने पावसाळा पाहता काठगोदाम ते आदि कैलास आणि ओम पर्वत ही यात्रा पुढे ढकलली आहेपिथौरागढच्या उंच हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झाले आहे. अशा काळात नैसर्गित आपत्तीचे संकट वाढण्याची भीती आहे. येत्या काळात परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आदि कैलास यात्रा पूर्ववत सुरू होणार आहे.

8 दिवसांची असते यात्रा- कुमाऊ मंडल विकास निगमचा काठगोदाम ते आदि कैलास अशी 8 दिवसांची यात्रा असते. यामध्ये कुमाऊं मंडळाच्या विविध ठिकाणांना आणि मंदिरांना भाविक भेटी देत असतात. 4 मेपासून ही यात्रा सुरू झाली आहे. या वर्षी आतापर्यंत 20 तुकड्यांतील 125 भाविकांनी आदि कैलास आणि ओम पर्वताची यात्रा पूर्ण केली आहे. मात्र खराब पावसामुळे ही यात्रा मध्येच थांबवावी लागणार आहे. भाविकात आदि कैलास यात्रेला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरातून भाविक आदि कैलास यात्रेला येतात.

आदि कैलास यात्रेचे काय आहे महत्त्व- हिंदू धर्मात कैलासाचे विशेष महत्त्व आहे. आदि कैलास हे स्थान भगवान शिवाशी संबंधित आहे. हिंदू धर्मात हे पवित्र स्थान मानले जाते. आदि कैलासला शिव कैलास, छोटा कैलास, बाबा कैलास आणि जोंगलिंगकॉंग शिखर म्हणूनही ओळखले जाते. आदि कैलास हे उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील हिमालय पर्वत रांगेत वसलेले आहे. आदि कैलास भारत-तिबेट सीमेजवळ असून उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 5,945 मीटर आहे.

आदि कैलास यात्रा काय असते? - स्कंद पुराणातील मानस विभागात आदि कैलास आणि ओम पर्वताच्या यात्रेचे महत्त्व कैलास मानसरोवराइतकेच असल्याचे म्हटले आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील भारत-तिबेट सीमेजवळ स्थित आदि कैलासची प्रतिमा कैलास पर्वतासारखी दिसते. या पर्वतावर भगवान शिव असल्याचे मानले जाते. या ठिकाणाचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व रामायण, महाभारत आणि पुराणात आढळते. वेद पुराणानुसार, जवळचे पार्वती सरोवर हे माता पार्वतीचे स्नानाचे ठिकाण आहे. ओम पर्वत हा तीन देशांच्या सीमांना जोडलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.