पुणे - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे. परेदशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अदर पूनावाला पुढे सरसावले आहेत. गुरुवारी त्यांनी टि्वट करून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याची माहिती दिली. अदर पुनावाला यांची कोरोनावरील लस कोव्हिशिल्डला परदेशात अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ही लस घेतली आहे. त्यांना विदेशात गेल्यानंतर क्वारंटाइन व्हावे लागत आहे. आशा विद्यार्थ्यांना अदर पुनावाला मदत करणार आहेत.
अदर पुनावाला यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे, की विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रिय विद्यार्थ्यांनो. परदेशात कोरोना प्रतिबंधित लस 'कोविशिल्ड'च्या वापरास अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर क्वारंटाइन व्हावे लागत आहे. यामुळे त्यांचा खर्च वाढत आहे. म्हणून मी आशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासोबत अदर पुनावाला यांनी टि्वटमध्ये एक लिंक दिली आहे. या लिंकवरून आर्थिक मदतीची गरज पडल्यासा विद्यार्थी अर्ज करू शकतात.
आंतरराष्ट्रीय प्रवासात अडथळा -
युरोपियन मेडिसीन एजन्सीने बायोएनटेक, फायझर, मॉर्डना आणि जानसीन (जॉन्सन अँड जॉन्सन) या लशींना मान्यता दिली आहे. अद्याप कोव्हिशिल्डला युरोपियन युनियनने कोव्हिशिल्डला परवानगी दिली आहे. त्यामुळे कोव्हिशिल्डची लस घेऊनही आंतरराष्ट्रीय प्रवास करताना अनेक प्रवाशांना अडचणी येत आहेत.
हेही वाचा - कोव्हिशिल्डला 16 युरोपियन देशांची परवानगी; अदर पुनावाला यांनी निर्णयाचे केले स्वागत
हेही वाचा - कोव्हिशिल्ड घेऊनही आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यातील अडथळा; पुनावाला यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया