ETV Bharat / bharat

Adani Row : व्यवहार चांगल्या स्थितीत, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल; अदानी समूहाचा दावा

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे अदानी समूहाच्यावतीने सांगण्यात आले आहे. कंपन्यांचा ताळेबंद खूप चांगला असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. अशी आशा अदानी समूहाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Adani Row
अदानी समूहाचा दावा
author img

By

Published : Feb 16, 2023, 1:11 PM IST

नवी दिल्ली : अदानी समूहाने बुधवारी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले की त्याचा ताळेबंद अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहे आणि शेअर्समध्ये सतत अस्थिरता असताना व्यवसाय वाढीचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर समभागांच्या किमतीत अन्यायकारक वाढ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारण अदानी समूह कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताच्या रक्षणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

तिमाही निकाल जाहीर : अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी तिमाही निकाल जाहीर केला. त्यानंतर गुंतवणूकदारांवा चर्चेत सांगितले की, समूहाला त्याच्या अंतर्गत नियंत्रणे, अनुपालन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल विश्वास आहे. समूहाने त्यांच्याकडे पुरेशी रोख रक्कम आहे आणि कर्ज फेडण्याची क्षमता आहे हे दर्शविण्यासाठी त्यांच्या कंपन्यांच्या आर्थिक स्टेटमेन्टचा सारांश देखील स्वतंत्रपणे जारी केला आहे. जुगशिंदर सिंग म्हणाले की, आमचे व्यवहार आणि बॅँकखाती अतिशय चांगल्या स्थितीत आहेत. आमच्याकडे उद्योगातील आघाडीची वाढ क्षमता, मजबूत कॉर्पोरेट ऑपरेशन्स, सुरक्षित मालमत्ता आणि मजबूत रोख प्रवाह आहे. सध्याचा बाजार स्थिर झाल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचे पुनरावलोकन करू, त्याशिवाय भागधारकांना मजबूत परतावा देणारा व्यवसाय वितरीत करण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल आम्हाला खात्री आहे.

हिंडेनबर्ग संशोधन अहवाल : 24 जानेवारीला हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यापासून गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह हा सतत कोणत्याना कोणत्या दबावाखाली आहे. अदानी समूहाने आपल्यावरील आरोप खोटे ठरवले असले तरी गुंतवणूकदारांच्या विश्वासाला यामुळे धक्का बसला आहे. गेल्या तीन आठवड्यांत समूह कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 125 अब्ज डॉलरनी घसरले आहे. या संदर्भात जुगशिंदर सिंग म्हणाले की, बाजारातील या अस्थिर वातावरणात त्यांचा व्यवसाय वाढविण्यावर त्यांचे लक्ष आहे. आमची अंतर्गत नियंत्रणे, नियामक अनुपालन आणि कंपनीच्या ऑपरेशन्सबद्दल आम्हाला खात्री आहे. अदानी समूहावर सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीअखेर एकूण २.२६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, तर ३१,६४६ कोटी रुपयांची रोकड होती. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी 25 वर्षांचा शिस्तबद्ध भांडवल ओतण्याचा इतिहास आहे. तो गुंतवणूका धाकरांना भरवष्याचा मुद्दा वाटतो.

हेही वाचा : Salesforce Layoff : 2 तासात 7000 कर्मचार्‍यांना काढून टाकणे ही चांगली कल्पना नव्हती: सेल्सफोर्सचे सीईओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.