ETV Bharat / bharat

अभिनेत्री जूही चावलाची 5 जी नेटवर्कच्या विरोधात कोर्टात धाव

जूही चावलाने 5-जी लॉन्च करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मी काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही. मात्र, 5 जी चा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, म्हणून रोखले पाहिजे, असे तीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

अभिनेत्री जूही चावला
अभिनेत्री जूही चावला
author img

By

Published : May 31, 2021, 5:46 PM IST

नवी दिल्ली - भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची वापर सुरू आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून देशात लवकरच 5 जी ची सेवा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले जात आहे. त्या दिशेने आता पावलंसुद्धा टाकली जात आहेत. मात्र, यातच अभिनेत्री जूही चावलाने 5 जी विरोधात भूमिका घेतली आहे.

जूही चावलाने 5-जी लॉन्च करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मी काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही. मात्र, 5 जी चा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, म्हणून रोखले पाहिजे, असे तीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच 5 जी येण्याअगोदर त्याच्या रेडिएशनचा लोकांच्या प्रकृतीवर काय परिणाम होईल त्याचा पहिल्यांदा अभ्यास व्हायला हवा, असेही तीच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

रेडिएशनचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 5 जी उपकरणांमधील रेडिएशनमुळे लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे, असे जूही चावलाने म्हटलं आहे. तसेच याचिकेत तीने यासंदर्भातील अभ्यासांचा हवाला दिला आहे. 5 जी तंत्र अत्यंत हानिकारक आहे. 5 जी हे मानवांसाठी सुरक्षित आहे, हे सिद्ध झालेले नाही. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान सुरू होण्यापासून रोखले पाहिजे, असेही तीने म्हटलं आहे.

रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम -

रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. रेडिएशनमुळे अनेकांनी काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँड आणि अमेरिकेतल्या काही प्रातांमध्ये 5 जी ही सेवा सुरू झाली आहे. भारतानेही ५ जी सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नोकिया कंपनीकडून ५ जी, क्लाउट आणि डिजीटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.