मेरठ - Actress Archana Gautam : रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस'चा भाग असलेली अभिनेत्री अर्चना गौतमवर काँग्रेस पक्षानं कारवाई केली आहे. काँग्रेस पक्षानं अर्चनाचे प्राथमिक सदस्यत्व 6 वर्षांसाठी रद्द केले आहे.
नुकतेच एआयसीसी कार्यालयाबाहेर काही महिलांनी अर्चना गौतमला केस ओढून ढकलले. काँग्रेसच्या माजी लोकसभा उमेदवार अर्चना गौतम तिच्या वडिलांसोबत 29 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पोहोचली होती. अर्चनाला कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. उलट तिला तिथे गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. या घटनेचे फुटेज इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे.
हस्तिनापूरमधील काँग्रेस विधानसभेच्या उमेदवार अर्चना गौतम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसनं अर्चनावर असा आरोप केला आहे की, ती पब्लिसिटी मिळविण्यासाठी या प्रकरणाला ओढत आहे. शनिवारी मेरठ जिल्हा काँग्रेस कमिटीने एसएसपी मेरठ यांना अर्चना आणि तिच्या वडिलांवर अनेक आरोप करत कारवाईसाठी पत्र दिले आहे. याशिवाय दिल्लीत अर्चना आणि महिला कामगार यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी दिल्लीत अर्चना आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वाद झाल्यानंतर शनिवारी तिच्या हकालपट्टीचे पत्र इंटरनेट मीडियावर व्हायरल झाले.
अर्चना गौतम या घटनेबाबत गुन्हा दाखल करू शकतात : मार्च महिन्याच्या सुरुवातीला अर्चनाच्या वडिलांनी प्रियंका गांधी वाड्रा आणि पीए संदीप सिंग विरोधात मेरठमधील परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काँग्रेसनं अर्चना यांच्यावर अनुशासनाच्या अनेक गंभीर आरोपांबाबत 31 मे रोजी नोटीस जारी केली आणि स्पष्टीकरण मागितले. एका आठवड्याच्या आत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं, अर्चना गौतम यांना राज्य युनिटच्या शिस्तपालन समितीनं सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले. त्यानंतर त्यांना 8 जून रोजी हकालपट्टीचे पत्र देण्यात आले.
प्रियंका गांधींच्या सचिवावर आरोप केले : अर्चना ही शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचली होती. तेथे तिनं पक्षाशी संबंधित लोकांवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. यावेळी तिची महिला कार्यकर्त्यांसोबत जोरदार हाणामारीही झाली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्या हकालपट्टीच्या चर्चेला उधाण आले आहे. अर्चना गौतमच्या वडिलांनी आरोप केला होता की, प्रियंका गांधींच्या पर्सनल सेक्रेटरीनं त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अर्चनाच्या वडिलांनी आरोप केला होता की, सचिव संदीप सिंग यांनी त्यांच्या मुलीसाठी अपमानास्पद शब्द वापरले होते. अर्चना गौतम सुपरस्टार सलमान खानच्या 'बिग बॉस 16' च्या रिअॅलिटी शोचा एक भाग होती.
हेही वाचा :