नालंदा (बिहार) : चित्रपट अभिनेते अन्नू कपूरच्या अकाउंट मधून केवायसीच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी ४.३६ लाख रुपये चोरले. (Annu Kapoor cyber crime). या प्रकरणाचे धागे-दोरे बिहारमधील नालंदाशी जोडलेले आहेत. (cyber thugs in bihar). पैसे उकळल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा सायबर सेलचे पोलीस नालंदा येथे पोहोचले. तेथून त्यांनी आशिष कुमार (28) नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
फोन करून खाते क्रमांक मागितला : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर तक्रारदाराला एचएसबीसी बँकेच्या मुख्य शाखेतून फोन आला. पलिकडच्या व्यक्तीने सांगितले की, जर तुम्ही तुमच्या खात्याचे केवायसी केले नसेल तर लवकर करा, अन्यथा ते बंद होईल. अन्नू कपूर यांनी फोनवरून त्यांचा बँक खाते क्रमांक सांगितला आणि ओटीपीही दिला. त्यानंतर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या ४.३६ लाख रुपयांची चोरी झाली.
ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : चित्रपट अभिनेता अन्नू कपूर यांनी या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास केला आणि आशिष कुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळले. मुंबईच्या ओशिवरा सायबर सेलच्या पोलिसांनी या तरुणाला नालंदा येथून अटक करून आपल्यासोबत नेले.
तपासात नालंदामध्ये सापडले सिमचे लोकेशन : तपासातून पोलिसांना मोबाईल सिमचे लोकेशन नालंदा, बिहारमध्ये सापडले. त्यानंतर पोलिसांनी येथे पोहोचून त्याचा शोध सुरू केला. झारखंडमधील जामतारा जिल्ह्यानंतर बिहारचे नालंदा सायबर ठगांसाठी सुरक्षित क्षेत्र बनले आहे.