हुबळी (कर्नाटक) Achievement in Cycling : तुम्हाला काही मोठं साध्य करायचं असेल तर वय हा फक्त आकडा आहे. वयाच्या 63 व्या वर्षीही एका व्यक्तीनं 5000 किमी सायकल चालवली आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंही नोंद घेतली आहे. गुरुमूर्ती मातरंगीमठ असं त्यांच नाव आहे. ते व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सायकलिंगमध्ये यश मिळवून आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श बनले आहेत.
दररोज 50 किमी सायकलवर प्रवास : 11 मे ते 18 मे या कालावधीत गुरुमूर्ती यांनी 100 दिवस दररोज 50 किमी सायकल चालवून एकूण 5000 किमीचं अंतर कापलंय. गुरुमूर्ती रोज पहाटे 4 ते 8 या वेळेत त्यांच्या सायकलवर 50 किमी अंतर कापत असत. ही कामगिरी केल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केलाय की, त्यांचं नाव इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. याआधी त्यांनी 2020-21 आणि 2021-22 मध्ये हुबळी सायकल क्लबकडून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हुबळी सायकल क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय.
सायकलिंगच्या निवडीमागील कारण : चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गुरुमूर्ती मातरंगीमठ यांना अनेक खेळांमध्ये रस होता. ते क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि टेनिससह अनेक खेळ खेळत असत. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांना नीट चालताही येत नव्हते. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं काही उपक्रम करण्याचा विचार त्यांनी केलाय.
सायकलिंगकडे कसे वळाले : त्याच्या निवासस्थानाजवळ एक सायकलस्वार पाहिल्यावर त्यांनी सायकलिंगकला सुरुवात केली. सायकल चालवल्यानं शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि पर्यावरण चांगले राहते. या दृष्टिकोनातून सायकल चालवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेला हा उपक्रम आता विक्रमात रुपांतरित झाला. या वयात सायकलवर 5 हजार किमी अंतर पार करून त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलंय.
- तरुण पिढीला संदेश : सध्याची तरुण पिढी चारचाकीकडं वळत आहे. यामुळं पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. तर गुरुमूर्ती तरुणांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना सायकलिंगकडे प्रवृत्त करण्याचं काम करत आहेत. त्यामुळं आता शेकडो तरुण त्याच्या कर्तृत्वानं प्रेरित होऊन सायकल चालवत आहेत.
हेही वाचा :
- Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादावर 'महाराष्ट्र एकीकरण समिती'ला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र; म्हणाले...
- Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्रातील मंत्री, खासदारांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी
- Threat To HC Judges : उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातील बँक खात्यात खंडणी मागितली