ETV Bharat / bharat

Minor Girl Set Fire: टवाळखोरांना लग्नात नृत्य करण्यास मज्जाव, नराधमांनी पेट्रोल टाकून बालिकेला पेटवले - पूजेत मुलींसोबत नृत्य करण्यास मज्जाव

लग्नात नृत्य करण्यास मज्जाव केल्यामुळे टवाळखोरांनी बालिकेला पेट्रोल टाकून पेटवल्याने खळबळ उडाली. ही घटना वैशाली जिल्ह्यातील राजापाकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या बालिकेला नराधमांनी घरासमोरुन तोंड दाबून उचलून नेले होते. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवम्यात आले. सध्या बालिकेवर हाजिपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 19, 2023, 7:42 PM IST

वैशाली - लग्नाच्या अगोदरच्या दिवशी करण्यात येणाऱ्या ग्रामीण पूजेत मुलींसोबत नृत्य करण्यास मज्जाव केल्याच्या रागातून टवाळखोरांनी बालिकेला पेट्रोल टाकून पेटवल्याने खळबळ उडाली. ही घटना वैशाली जिल्ह्यातील राजापाकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत पीडित बालिका गंभीर झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नृत्य करण्यास मज्जाव केल्याने चिडले टवाळखोर : राजापाकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्न होते. या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी ग्रामीण पूजेत काही मुली नृत्य करत होत्या. यावेळी काही टवाळखोर यावेळी नृत्य करण्यासाठी घुसले होते. त्यामुळे काही मुलींनी त्यांना नृत्य करण्यास मज्जव केला. त्यामुळे टवाळखोरांच्या अंगाचा तिळतिळ झाला.

बालिकेच्या अंगावर पट्रोल टाकून लावली काडी : टवाळखोरांना नृत्य करण्यास मज्जाव करताना एका सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेचाही समावेश होता. त्यामुळे वरातीवरुन परतल्यानंतर टवाळखोरांनी त्या बालिकेला अडवले. मात्र बालिकेने आरडाओरडा केल्यामुळे टवाळखओरांनी यावळी तेथून पळ काढला. त्यामुळे बालिकेने ही बाब कोणालाही न सांगता घरी आजीसोबत जाऊन झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी बालिका उठून शौचास जाताना दोन टवाळखोरांनी तिचे तोंड दाबून तिला उचलून नेले. घरापासून थोडे दूर नेल्यानंतर त्यांनी तिला पेटवून देणार असल्याचे सांगत तिच्यावर पेट्रोल टाकले. काहीही मागेपुढे न पाहता, त्यांनी तिला पेटवून दिले. त्यामुळे पीडिता गंभीर भाजली. तिने आरडाओरडा केल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेत तिची आगीतून सुटका केली.

बाजुच्या भैय्याने तोंड दाबून उचलून नेले : आम्ही वरातीनंतर पंगतीत जेवण करुन परत येत होतो, तेव्हा बाजुच्या भैय्याने आम्हाला अडवले. यावेळी त्यांनी जाऊ देणार नसल्याचे सांगितल्याने आम्ही ओरडलो. त्यामुळे ते पळाले. मग आम्ही घरी जाऊन झोपलो. परंतु सकाळी उठून जेव्हा बाथरुमला गेले, तेव्हा दोन्ही भैय्याने तोंड दाबून उचलून नेले. त्यानंतर त्यांनी पेट्रोल टाकून पेटवल्याची माहिती पीडितेने दिली.

हाजीपूर रुग्णालयात उपचार सुरू : नराधमांनी पेट्रोल टाकून जाळल्याने बालिका गंभीर जखमी झाली. त्यामुळे बालिकेला हाजिपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तिच्या शरीराचा काही भाग गंभीर जखमी झाल्याची माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली.

पोलीस तपास सुरू : बालिकेवर पेट्रोल टाकून जाळल्यामुळे देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी घटनेतील पीडितेला हाजीपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाजीपूर रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून प्रतिसाद नाही : बालिकेच्या अंगावर नराधमांनी पेट्रोल टाकून जाळल्याने देशभर खळबळ उडाली आहे. त्यामुळे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने पोलिसांना याबाबत विचारणा केली. मात्र पोलिसांकडू कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम केसरी यांचा भ्रमणध्वनी बंद आहे. तर राजापाकर पोलीस ठाण्याचे ठाणेदारही आऊट ऑफ कव्हरेज आहे. पोलीस अधीक्षकांच्या फोनवर फोन केल्यानंरही त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इतकी मोठी गंभीर घटना घडूनही पोलीस कोणतीच माहिती देत नसल्याने माध्यम प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Sherlyn Chopras Complaint : वादग्रस्त राखी सावंतची का केली शर्लिन चोप्राने केली तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.