बंगळुरू Buffalo Theft Arrested After 58 Years: वयाच्या 20 व्या वर्षी उदगीरच्या चोरानं कर्नाटकमधील बिदरमधून म्हैस चोरली ( Animal Theft ) होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर हे आरोप जामीनावर बाहेर आले, मात्र त्यानंतर फरार झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी म्हैस चौरणाऱ्या आरोपीला तब्बल 58 वर्षानं अटक केली आहे. किशन चंदर आणि गणपती वाघमारे असं उदगीर इथल्या म्हैस चौरणाऱ्या आरोपींचं नाव आहे.
उदगीरच्या दोघांवर झाला गुन्हा दाखल : बिदर इथल्या मुरलीधरराव कुलकर्णी यांच्या दोन म्हशी चोरल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या म्हशी आणि वासरु उदगीरमधील किशन चंदर आणि गणपती वाघमारे यांनी या म्हशी चोरल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या म्हैस चोरांना अटक केली होती.
चोरांना पोलिसांनी तब्बल 58 वर्षानंतर केलं अटक : बिदर इथल्या म्हैस चोरी प्रकरणात पोलिसांनी किशन चंदर आणि गणपती वाघमारे या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं. मात्र न्यायालयानं जामीन दिल्यानं हे दोघंही बाहेर आल्यानंतर फरार झाले होते.
एकाचा झाला मृत्यू दुसरा अटक : म्हैस चोरल्यानंतर दोघंही फरार झाल्यानंतर यातील एक आरोपी किशन चंदर याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या चोरी प्रकरणातील दुसरा आरोपी गणपती वाघमारे हा फरार झाला होता. त्यामुळे पहिला आरोपी असलेला किशन याचा खटला त्याच्या मृत्यूमुळे रद्द करण्यात आला. तर गणपती वाघमारे याच्यावर खटला सुरुच होता. मात्र तो पोलिसांना मिळून येत नव्हता.
पोलिसांनी गणपती वाघमारेच्या आवळल्या मुसक्या : पोलिसांनी जुन्या प्रकरणासाठी एक विशेष पथक स्थापन केलं होतं. या पथकानं जुन्या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानं त्यांनी गणपती वाघमारेचा शोध घेतला. या पथकाला गणपती वाघमारेला अटक करण्यात यश आल्याची माहिती माहिती पोलीस अधीक्षक चण्णाबसवण्णा एस एल यांनी दिली. गणपती वाघमारेनं चोरी केली, तेव्हा तो 20 वर्षाचा होता, मात्र आता त्याचं वय 78 वर्षाचं असल्याचंही पोलीस अधीक्षक चण्णाबसवण्णा एस एल यांनी दिली.
हेवी वाचा :