बाडमेर - एसयुवी कार आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ( Accident ) 8 जण मृत्युमुखी पडले. हे सर्वजण एकाच परिवारातील होते. राजस्थानच्या बाडमेर ( Accident In barmer ) जिल्ह्यातील गुडामालानी हायवेवर सोमवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
आनंद क्षणात लोपला - राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे राहणाऱ्या या परिवारातील सर्व सदस्य आपल्या एसयुवी कारने गुडमालानी येथे सोमवारी रात्री लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र विहाहस्थळी पोहोचण्यापूर्वीच आठ किलोमीटरवर अंतरावर हा अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की सहा जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. चार जणांना गुडामालानीमधील शासकीय दवाखान्यात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. अन्य दोन गंभीर जखमींना सांचौर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गुडामालानी पोलिस स्टेशनचे पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा - आघाडीकडे 168 आमदारांची मते, पहिल्या फेरीतच चारही उमेदवार निवडून येतील - भास्कर जाधव