ETV Bharat / bharat

EVM Machine Missing : सुमारे 19 लाख ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा एच. के. पाटील यांचा दावा

author img

By

Published : Apr 1, 2022, 10:51 AM IST

कर्नाटक विधानसभे मंगळवारी (दि.29 मार्च)रोजी निवडणूक सुधारणांवरील विशेष चर्चेदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) महाराष्ट्राचे प्रभारी सचिव आणि माजी मंत्री एच. पाटील यांनी (2016 ते 2018)या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा दावा केला आहे. पाटील यांच्या या दाव्याने देशभरात आता एकच खळबळ उडाली आहे.

एच. के. पाटील
एच. के. पाटील

बेंगळुरु - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) महाराष्ट्राचे प्रभारी सचिव आणि माजी मंत्री एच .के पाटील यांनी (2016 ते 2018)या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा दावा केला आहे. (EVM Machine Missing In Karnatak) निवडणुक सुधारणांवर झालेल्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे. यावर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल असे आश्वाकन दिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (EC) अधिकाऱ्यांनाही बोलावल जाईल असही ते म्हणाले आहेत.

ईव्हीएमबाबत अनेक शंका आहेत - विधानसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निवडणूक अनियमिततेवर आपली मते मांडली. (Former Minister H. Patil) पण काँग्रेसचे एच .के पाटील यांनी निवडणूक सुधारणेवर चर्चेत (2016 ते 2018)या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा दावा केला आहे.

शंका दूर करण्याचा कोणताही प्रयत्न नाही - नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये 53 मंत्र्यांपैकी 22 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. यावर लोक काय विचार करतील? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (H. K. Patil EVM claims to be missing) ईव्हीएमबाबत अनेक शंका आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने ही शंका दूर करण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

ईव्हीएम गैरव्यवहाराबाबतचा आमचा संशय अधिकच वाढेल - विधानसभेत पाटील म्हणाले, ईव्हीएम गहाळ होण्याचा आकडा धक्कादायक आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने या आरोपांना उत्तर द्यावे लागेल. या गहाळ ईव्हीएमचा गैरवापर होण्याची शक्यता कशी नाकारू शकते? या ईव्हीएमचे काय झाले या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही, तर ईव्हीएम गैरव्यवहाराबाबतचा आमचा संशय अधिकच वाढेल, असेही पाटील म्हणाले आहेत.

आता परिस्थिती बदलली आहे - यावर बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणतात, निवडणूक व्यवस्था बिघडली आहे. याला लोक आणि पक्ष जबाबदार होते. या प्रकरणावर कुमारस्वामी यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. बुधवारी निवडणूक व्यवस्थेतील सुधारणांची गरज या विषयावरील विशेष चर्चेत ते बोलत होते. पूर्वी लोक निवडणुकीसाठी उमेदवारांना पैसे देत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Ukraine-Russia War 37th Day : युद्ध थांबेना! युक्रेन-रशियामध्ये आज पुन्हा होणार चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.