ETV Bharat / bharat

भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर यांची दूरदृष्टी घेऊन 'आप' काम करणार - मनिष सिसोदिया - Goa Assembly Election

'आप' चे राजकारण हे प्रामाणिकपणाचे आणि दूरदृष्टी असलेले आहे. प्रामाणिकपणामुळे सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. ज्यामुळे आवश्यक विकास साधता येतो. मागील पाच वर्षांत दिल्लीचे अंदाजपत्रक दुप्पट झाले. कर आकारणी कमी करूनही मोठ्याप्रमाणात कर जमा झाला. हे पाहता सरकारकडे निधी कमी नसतो‌. नेतृत्व प्रामाणिक पाहिजे, असे आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया
author img

By

Published : Apr 12, 2021, 6:04 PM IST

पणजी - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडे दूरदृष्टीकोन होता. तो काँग्रेस आणि भाजप यांनी संपविला. तर भाजपनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडे व्यक्तीगत पातळीवर लोकांना एकत्र करत विकास साधण्याचा दृष्टीकोन होता. तो त्यांच्या निधनानंतर भाजपने बाजूला सारला. अशा स्थितीत गोव्याच्या विकासासाठी 'आम आदमी पक्ष' या दोन्ही नेत्यांच्या दृष्टीकोनातून अपेक्षित विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज केले.

अन्य पक्षात घुसमट होणाऱ्यांना 'आप' मधे प्रवेश दिला जाणार

पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिसोदिया म्हणाले, आम आदमी पक्ष प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे रविवारी पक्षाच्या गोव्यातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर झाले. यामध्ये विविध ठिकाणांहून (व्हर्चुअल) 4 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. सहा महिन्यांपूर्वी पक्षाची गोव्यात अशी स्थिती नव्हती. पक्ष वाढत चालला याचा अर्थ लोकांच्या पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गोवा विधानसभेच्या सर्वच म्हणजे 40 ही जागांवरुन 'आप' निवडणूक लढणार आहे. जे राजकारण गोव्यातील लोकांना हवे आहे तेच करणार आहे. अन्य पक्षात ज्यांची घुसमट होत आहे आणि ज्यांना गोव्याविषयी काही करावेसे वाटते त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. अलिकडे पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप' ला 15 टक्के मते मिळाली आहेत.

'आप' नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया

आगामी विधानसभा निवडणुकीत 'आप' पूर्ण बहुमताचे सरकार बनविणार आहे.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्याचा विकास दूरदृष्टीने केला होता. तो नंतर काँग्रेस आणि भाजप यांनी संपविला, असा आरोप करत सिसोदिया म्हणाले, अलिकडे मनोहर पर्रीकर यांनीही व्यक्तीगत पातळीवर लोकांना एकत्र करत विकास साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांचाही दृष्टीकोन बाजूला ठेवला. आगामी विधानसभा निवडणुकीत 'आप' पूर्ण बहुमताचे सरकार बनविणार आहे असेही ते म्हणाले.

'आप' चे राजकारण हे प्रामाणिकपणाचे आणि दूरदृष्टी असलेले
विधानसभा निवडणूक दूसऱ्या पक्षासोबत लढवणार अथवा सर्व विरोधी पक्ष मिळून एकत्रित लढणार?, असे विचारले असता सिसोदिया म्हणाले, सध्याचे विरोध पक्ष भाजपसोबत आहेत. भाजपला हवे तसे करतात. लोकांना हवे तसे नाही. त्यामुळे लोक म्हणातात सरकार काही करत पण विरोधकही काहीच करत नाही. अशा स्थितीत गोव्यातील विचारी लोक 'आप' चे मतदार अथवा समर्थक व्हावे, अशी इच्छा आहे. कारण 'आप' चे राजकारण हे प्रामाणिकपणाचे आणि दूरदृष्टी असलेले आहे. प्रामाणिकपणामुळे सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. ज्यामुळे आवश्यक विकास साधता येतो. मागील पाच वर्षांत दिल्लीचे अंदाजपत्रक दुप्पट झाले. कर आकारणी कमी करूनही मोठ्याप्रमाणात कर जमा झाला. हे पाहता सरकारकडे निधी कमी नसतो‌. नेत्रुत्व प्रामाणिक पाहिजे, असेही सिसोदिया म्हणाले. यावेळी 'आप' चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे, सुरेल तिळवे, जिल्हा पंचायत सदस्य हेंन्झल फर्नांडिस आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सिसोदिया यांनी भाऊसाहेब बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर यांच्या समाधिस्थळांना भेट दिली‌. तसेच पणजीचे ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.

हेही वाचा - कुरानमधील 26 आयत हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.