ETV Bharat / bharat

AAP Victory in Punjab Assembly Election :आपने अशी मारली पंजाबमध्ये मुसंडी; विजयाने अकाली दलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह - पंजाब आम आदमी ऐतिहासिक विजय

निवडणुकीपूर्वीच पक्षात मतभेद असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री बदलून दलित चेहरा चरणजितसिंग चन्नी यांना संधी ( CM Charan singh Channa ) दिली. पण सीएम चरणजीत सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला. काँग्रेसचे उपमुख्ययमंत्री नवज्योत सिंग सिद्धू हेदेखील ( Navjyot singh Siddhu defeat ) पूर्व अमृतसर मतदारसंघातून पराभतू झाले आहेत. काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे चन्नी यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्याचा राहुल गांधींचा निर्णय गोत्यात आणणार ठरला आहे.

आम आदमी पक्ष
आम आदमी पक्ष
author img

By

Published : Mar 10, 2022, 7:51 PM IST

नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल बऱ्याच प्रमाणात खरे ठरल्याचे ( election 2022 ) दिसत आहे. आम आदमीला ऐतिहासिक विजय ( Historical win of AAP in Punjab ) मिळाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या तीन तासांत आप 89 जागांवर आघाडीवर मिळाली होती. त्यानंतर निकालात आपने 89 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे अकाली दल आणि काँग्रेस आपच्या तुलनेत खूप मागे आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला आम आदमी पक्ष हा पहिल्या क्रमांकावर आहे.

निवडणुकीपूर्वीच पक्षात मतभेद असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री बदलून दलित चेहरा चरणजितसिंग चन्नी यांना संधी ( CM Charan singh Channa ) दिली. पण सीएम चरणजीत सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला. काँग्रेसचे उपमुख्ययमंत्री नवज्योत सिंग सिद्धू हेदेखील ( Navjyot singh Siddhu defeat ) पूर्व अमृतसर मतदारसंघातून पराभतू झाले आहेत. काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे चन्नी यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्याचा राहुल गांधींचा निर्णय गोत्यात आणणार ठरला आहे.

हेही वाचा-Jeevanjot Kaur : नवज्योत सिंग सिद्धूसह विक्रम मजिठियांचा पराभव करणाऱ्या कोण आहेत जीवनज्योत कौर?

अकाली दलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यासमोर पक्षाला एकसंध ठेवण्याचे आणि बंडखोरीपासून वाचवण्याचे दुहेरी आव्हान होते. लांबीतून सहाव्यांदा निवडणूक लढवलेले प्रकाशसिंग बादल आणि चौथ्यांदा जलालाबादमधून निवडणूक लढवलेले त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल यांन ‘आप’च्या प्रभावामुळे पराभूत व्हावे लागले. या दोन दिग्गज नेत्यांच्या पराभवामुळे आगामी काळात अकाली दलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण उभे राहणार आहे. याशिवाय सुखबीर सिंग बादल यांच्या नेतृत्वावरही पक्षांतर्गत प्रश्न निर्माण होणार आहेत.

हेही वाचा-Goa Election 2022 Result : गोव्यात भाजपचा विजय, काँग्रेसला जनतेने का नाकारले? पाहा सविस्तर विश्लेषण..

डेरांनी दिलेले आदेशही कुचकामी ठरले

यावेळी आम आदमी पक्षाने माळवा, माझा आणि दोआबासह संपूर्ण पंजाब जिंकला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे दलित कार्डही चालू शकले नाहीत. याशिवाय मतदानापूर्वी डेरा सच्चा सौदासह अनेक डेरांनी शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. डेरांनी दिलेले आदेशही कुचकामी ठरले आहेत.

हेही वाचा-Charanjit Singh Channi Lost Election : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांना दोन्ही जागांवर मतदारांनी नाकारले, जाणून घ्या, त्याची कारकीर्द

मागील निवडणुकीच्या तुलनेत आम आदमी पक्षाला 23 टक्क्यांहून अधिक मते

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होता. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने 20 जागा जिंकल्या होत्या. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, आम आदमी पक्षाला 23 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. पंजाबमधील होशियार, कपूरथला, मोगा, रूपनगर आणि एसएएस नगर जिल्ह्यांमध्ये 'आप'ला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. संगरूर, फरीदकोट आणि मानसा जिल्ह्यात प्रत्येकी दोन जागा 'आप'च्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या. याशिवाय आम आदमी पक्षाने लुधियाना, भटिंडा आणि बर्नाला जिल्ह्यात प्रत्येकी तीन जागा जिंकल्या होत्या.

अल्पावधीत आपला मिळाले यश

आम आदमी पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही हात आजमावला. आपने लोकसभेच्या 13 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. आम आदमी पक्षाला सुमारे 20 टक्के मते मिळाली. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंजाबमधून केवळ एक जागा जिंकता आली. भगवंत मान हे संगरूरमधून लोकसभेवर निवडून आले होते. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. शिरोमणी अकाली दलाने 15 जागा जिंकल्या होत्या. यापूर्वी 2012 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप' अस्तित्वात आली नव्हती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.