ETV Bharat / bharat

Transgender Couple Birth Baby : ट्रान्सजेंडर जोडप्याने दिला बाळाला जन्म! लिंग ओळख सांगण्यास नकार - केरळमधील एक ट्रान्सजेंडर जोडपे

अनेक दिवसांपासून जगभरात केरळमधील एक ट्रान्सजेंडर जोडपे चर्चेत आहे. ते चर्चेत असण्याचे कारण त्यांनी आम्हाला लवकरच बाळ होणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून हे झोडपे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता पु्न्हा नव्याने चर्चा सुरू होण्याचे कारण या झोडप्याने आज बुधवार (8 फेब्रुवारी) बाळाला जन्म दिला आहे. याबद्दलची बातमी समोर येताच हे झोडपे पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहे.

Transgender Couple Birth Baby
ट्रान्सजेंडर जोडप्याने दिला बाळाला जन्म
author img

By

Published : Feb 8, 2023, 9:32 PM IST

नवी दिल्ली : या झोडप्याने आपल्या गर्भधारणेची घोषणा केली होती. त्यानंतर याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आज या जोडप्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे सकाळी ९.३० वाजता एका बाळाला जन्म दिला आहे. दरम्यान, ट्रान्सजेंडर झोडप्याने बाळाला जन्म देण्याची देशातील हे पहिले प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रान्स पार्टनर्समधील जिया पावल यांनी सांगितले की, बाळाचा जन्म झाला असून, यातील जन्म देणारा त्यांचा जोडीदार जऱ्हाड आणि बाळ या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

आई आणि वडील बनण्याचे स्वप्न : या ट्रान्स जोडप्याने आपल्याला बाळ झाल्याची बातमी दिली असली तरी नवजात बाळाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला आहे. तसेच, आम्ही ती ओळख सध्या सार्वजनिक करु इच्छित नाहीत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. जिया पावलने नुकतेच इन्स्टाग्रामवर जहाद आठ महिन्यांची गरोदर असल्याची घोषणा केली होती. त्यावर आता सांगितले की आमची आई आणि वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली होती माहिती : पावेल आणि जऱ्हाड गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत. जिया पावल या प्रोफेशनल डान्सर आहे. तीने 4 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर घोषणा केली होती, की तिचा पार्टनर जहादच्या पोटात आठ महिन्यांचे बाळ वाढत आहे. पावले यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझे आई आणि तिचे वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जहादच्या पोटात आठ महिन्यांचा गर्भ आहे अशी माहिती त्यांनी अगोदर दिली होती.

लिंग बदलण्यासाठी हार्मोन थेरपी : भारतात ट्रान्सजेंडर व्यक्तीची गर्भधारणेची ही पहिलीच घटना आहे. वास्तविक, हे जोडपे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांचे लिंग बदलण्यासाठी हार्मोन थेरपी घेत होते. जऱ्हाद पुरूष बनणार असला तरी मूल होण्याच्या इच्छेने त्याने ही प्रक्रिया थांबवली होती. आपल्याला आई-वडिल होयचे आहे हे त्यांचे ठरलेले असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्यातील जऱ्हादला गर्भधारणा झाली आणि त्याने आता बाळाला जन्म दिला आहे.

काय आहे प्रकरण? : तीन वर्षांपूर्वी केरळच्या कोझिकोड शहरात जिया पॉल जऱ्हादला भेटली होती. हे दोघेही ट्रान्सजेंडर होते. पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांच्यात जवळीक वाढू लागली. त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. जिया सुरुवातीला एक मुलगा होता. मात्र, जऱ्हादला भेटल्यानंतर वर्षभरानंतर त्याने आपले लिंग बदलून तो मुलगी झाली.

हेही वाचा : राखी सावंतचा पती आदिल दुर्राणीला न्यायालयीन कोठडीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.