ETV Bharat / bharat

दिल्लीतील NCB चे वरिष्ठ अधिकारी उद्या मुंबईत; समीर वानखेडेंवरील आरोपांची करणार चौकशी

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीची तीन सदस्यीय टीम उद्या दिल्लीहून मुंबईला जाणार आहे.

author img

By

Published : Oct 25, 2021, 3:08 PM IST

Sameer Wankhede
समीर वानखेडे

मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीची तीन सदस्यीय टीम उद्या दिल्लीहून मुंबईला जाणार आहे. या टीममध्ये NCB चे DDG ज्ञानेश्वर सिंग आणि 2 निरीक्षक स्तरावरील अधिकारी असतील.

  • CORRECTION: A three-member team of NCB will go from Delhi to Mumbai tomorrow to probe the allegations of corruption* levelled against NCB Zonal Director Sameer Wankhede. The team will comprise DDG NCB Gyaneshwar Singh and 2 inspector level officers: NCB Sources pic.twitter.com/QrLhdzYTwq

    — ANI (@ANI) October 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • एनसीबीची तीन सदस्यीय टीम उद्या मुंबईत -

हेही वाचा - नवाब मलिकांच्या ट्विटला समीर वानखेडेंचे परिपत्रकाद्वारे प्रत्त्युत्तर, म्हणाले...

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील रेव्ह पार्टीप्रकरणी एनसीबीकडून अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. अशातच आता या प्रकरणामध्ये प्रभाकर साईलने धक्कादायक खुलासे केल्यानंतर वानखेडे यांच्या भूमिकेबद्दल संशय घेतला जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे तीन अधिकारी उद्या दिल्लीहून मुंबईत येणार आहेत.

  • साईलने काय दावा केला?

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फत शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला आहे. समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल याने सांगितले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस गप्प होतो, असा दावाही साईल केला आहे. किरण गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा दावा साईलने केला आहे.

हेही वाचा - आमची लढाई एनसीबीशी नाही तर चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.