जयपूर- लिंबाचे भाव वाढल्याने आता चक्क चोरांनी लिंबाच्या चोरीकडे मोर्चा वळविला आहे. पूर्वी ४०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लिंबावर चोरांचा डोळा आहे. मुहाना मंडीमधून ( Lemon Theft In jaipur Mandi ) 50 किलो लिंबू चोरून एक चोर फरार झाला आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चोर हा ई-रिक्षातून बाजारात प्रवेश करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यानंतर लिंबूने भरलेले कॅरेट चोरतो. त्यानंतर ई-रिक्षात ठेवून पळून जातो. आश्चर्यकारक बाब म्हणजे, व्यावसायिकाच्या घरी अशा प्रकारे दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. तेव्हा 50 किलो लिंबू चोरीला गेल्याचे ( lemon theft incident in Jaipur ) समोर आले. यानंतर व्यावसायिक दीपक यांनी मुहाणा पोलिस ठाण्यात लिंबू चोरीचा गुन्हा दाखल केला ( jaipur Mandi CCTV Footage Shows Man Stealing Sour Fruit) आहे.
एका दिवसात 50 किलो लिंबू चोरले- पोलीस अधिकारी लखन सिंह यांनी सांगितले की, जयपूर मंडीतील भाज्यांचा घाऊक व्यापार करणाऱ्या दीपक यांच्या दुकानातून लिंबू चोरीला गेले आहेत. तक्रार नोंदवल्यानंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्या लिंबू चोराचा शोध ( jaipur Mandi CCTV Footage ) सुरू आहे. चोरट्याने एका दिवसात 50 किलो लिंबू चोरले आहेत. त्याची किंमत 20 हजारांच्या आसपास सांगितली जात आहे.
8 दिवसांपूर्वी झालेली चोरी आता उघडकीस - चोरट्याने आठ दिवसांपूर्वी दीपक यांच्या दुकानातून लिंबूचे कॅरट चोरले होते. दीपक आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची माहिती नव्हती. गुरुवारी चोरट्याने अशीच लिंबू चोरी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी दीपक यांनी लिंबाचा साठा तपासला असता दोन क्रेट गायब झाल्याचे आढळले. त्यात 50 किलो लिंबू ठेवलेले होते. यानंतर दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. ई-रिक्षा चालविणारा चोरटा समोर आला आहे. दीपक यांनी मुहाणा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला.
पेट्रोलपेक्षा लिंबू महाग-दरम्यान, एक महिन्यापूर्वी 40 रुपये किलो असलेले लिंबू दर आता 240 रुपये किलोपर्यंत गेले आहे. लिंबाच्या वाढलेल्या किंमतीने पेट्रोलच्या दराला देखील मागे टाकले ( Lemon Price Hike In Aurangabad ) आहे. फेब्रुवारी महिन्यात बाजारामध्ये लिंबाला मागणी कमी असल्यामुळे 40 रुपये किलो प्रमाणे भाव होता. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने रसवंती चालू झाल्या आहेत. त्याचसोबत रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये देखील लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कधीकाळी 40 रुपये किलो असलेल्या लिंबाचे दर आता पाचपट वाढून 250 रुपये झाले आहे.
हेही वाचा-Lemon Price Hike : लिंबाच्या किंमतीने पेट्रोलच्या दरालही टाकले मागे; पाच पटीने वाढ
हेही वाचा-रेल्वेमंत्र्यांनी हिरावले मुंबईकरांचे पाच रुपयांचे लिंबू पाणी; ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल