ETV Bharat / bharat

Serial Killer Arrested: चार महिलांची संशयास्पद हत्या करत दहशत पसरवलेल्या सीरियल किलरला बेड्या - Barabanki News

4 महिलांची संशयास्पदरीत्या हत्या करत दहशत माजवणाऱ्या एका सीरियल किलरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या या कृत्यामुळे लोकांमध्ये चांगलीच घबराहट पसरली होती. महिलांनी तर या प्रकाराला घाबरुन घराबाहेर एकटे पडणेही बंद केले होते. (murdering four women was arrested)

serial killer arrested
सीरियल किलरला बेड्या
author img

By

Published : Jan 26, 2023, 4:44 PM IST

बाराबंकी : जिल्ह्यातील 4 वृद्ध महिलांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला सोमवारी अटक करण्यात आली. अयोध्येतील मवई येथून पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या एक महिन्यापासून बाराबंकी, अयोध्या आणि आसपासचे पोलीस त्याच्या अटकेसाठी गावोगाव आणि जंगलात शोध घेत होते. या सीरियल किलरमुळे परीसरामध्ये प्रचंड घबराहट पसरली होती. सोमवारी अयोध्या पोलिसांनी अटक केलेल्या त्या तरुणांला बाराबंकी येथील घटनास्थळी ओळख पटवण्यासाठी आणले होते. सध्या पोलीस त्या तरुणाची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुनहुना गावात हा तरुण एका महिलेला मारण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी संबंधित महिलेने आरडा ओरडा गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याने आपले नाव अमरेंद्र रावत असल्याचे सांगितले. जो बाराबंकी जिल्ह्यातील असांद्रा पोलीस स्टेशन परिसरातील सदवा भेलू गावचा रहिवासी आहे. त्याच्या दहशतीमुळे महिलांनी घरातून एकटे बाहेर पडणे बंद केले होते.

शुक्रवार 30 डिसेंबर रोजी रामस्नेहीघाट पोलीस स्टेशन हद्दीतील थाथरा गावाच्या काठावर गावकऱ्यांना चप्पल, कपडे, एक पायल आणि एक बाटली पडलेली दिसली. थोडे पुढे गेल्यावर एका ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला दिसला. मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गुरुवारी रात्री शौचासाठी बाहेर गेली होती. मात्र, घरी परतली नाही. नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. कुटुंबीयांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला होता. त्याचप्रमाणे 17 डिसेंबर रोजी घटनास्थळापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या गावातील नाल्याच्या काठावर 65 वर्षीय महिलेचा असाच संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.

याच पंधरवड्यात दोन महिलांचे मृतदेह सापडल्या नंतर पोलीस विभाग सतर्क झाल. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. आणि अशाच प्रकारे घडलेल्या या खुनांचा पोलिसांनी तपास सुरू केलाा. जुलैमध्येही याच परिसरात एका महिलेचा मृतदेह अशाच परिस्थितीत आढळून आला होता. या तिन्ही महिलांच्या मृतदेहांनी पोलिस विभागाची झोप उडवली. कोणीतरी सायको किंवा सिरीयल किलर या हत्या करत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ही शंका लक्षात घेऊन पोलीस तपासात गुंतले. या खूनांना आव्हान म्हणून घेऊन पोलिसांनी घटनांचा बारकाईने अभ्यास केला.

यातच एका संशयित तरुणाबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले. संशयिताच्या शोधात पोलिसांनी जंगल-जंगल शोध मोहीम राबवली. आसपासच्या गावात फिरून संशयिताचा फोटो गावकऱ्यांना दाखवत त्यांची चौकशीही केली. मात्र, तो सापडत नव्हता. मात्र, अखेर त्याला अयोध्या पोलिसांनी अटक केली. हा तरुण विकृत मानसिकतेचा आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : Purnia Gangrape Agttempt : धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेने बसमधूनच घेतली उडी, गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.