चिक्कमगलुरु (कर्नाटक) - एकीकडे लोक एका फुटाच्या जागेसाठी झगडत आहेत. तर दुसरीकडे चिक्कमगलुरू येथील एका व्यक्तीने साडेचार एकर जमीन दान करून जातीय सलोख्याचा आदर्श ठेवला आहे. कॉफी क्युअर चालवणारे मोहम्मद नसीर यांनी आपली 4.5 एकर जमीन गोठा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि पंचमुखी हनुमान मंदिर बांधण्यासाठी दान केली आहे. कडुरू-मंगलोर राष्ट्रीय महामार्ग 173 च्या रस्त्याच्या कडेला पडलेली जमीन त्यांनी दान केली आहे.
या जमिनीची किंमत सुमारे दोन कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद नसीर यांनी ही जागा चिक्कमगालुरूच्या स्वामी समर्थ रामदास ट्रस्टला दान केली आहे. याबाबत बोलताना नसीर म्हणाले की, 'मी ही जागा एका ट्रस्टला दिली आहे. त्यांना पाहिजे ते चांगल्या कारणासाठी वापरणार आहेत. जसे मातेचे ऋण फेडता येत नाही तसेच गायीचे ऋण फेडता येत नाहीत. मी माझ्या आईचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असही ते म्हणाले आहेत.
'माझ्या आईला कॅन्सर झाला तेव्हा तिने गोमूत्र प्यायले आणि बरी झाली. त्यामुळे गायीचे ऋण फेडायचे आहे. गायीचे ऋणही फेडता येत नाही. मात्र, ही साडेचार एकर जागा मी ट्रस्टला गोशाळा बांधण्यासाठी दिली असून त्यांना शक्य ती मदत केली आहे. पंचमुखी अंजनेय मंदिराच्या उभारणीसाठी या ठिकाणी यापूर्वीही पूजा करण्यात आली आहे. तेथे हनुमानजींची मूर्ती विराजमान होईल.
नसीर यांच्या या कामाचे स्थानिक लोकांनीही कौतुक केले आहे. मनातील रावणाचा वध केल्याने प्रत्येकजण रामाचे रूप बनू शकतो. नसीर समाजासाठी आदर्श ठरल्याचा विश्वस्तांना आनंद आहे. या जमिनीची नोंदणी ट्रस्टच्या नावावर करण्यात आली असून लवकरच येथे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गुरुकुल, अंजनेय मूर्ती आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे. नसीर यांचे हे कार्य हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.