ETV Bharat / bharat

तेलंगणातील मेडकमध्ये भाजपा नेत्याला कारमध्ये कोंडून जीवंत जाळले - तेलंगणात भाजपा नेत्याला जाळले

मेडक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक चंदना दीप्ती यांनी सांगितले की काही अज्ञातांनी भाजपा नेत्याला त्यांच्या कारसह पेटवून दिले. आम्हाला कारच्या डिक्कीत प्रसाद यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली जात आहे.

भाजपा नेत्याला कारमध्ये कोंडून जीवंत जाळले

author img

By

Published : Aug 11, 2021, 10:05 AM IST

हैदराबाद - तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील एका स्थानिक भाजपा नेत्यास कारच्या डिक्कीत बंद करून जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात गुंडांनी भाजपाच्या नेत्याला कारमध्ये कोंडून कार पेटवून दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत भाजपा नेत्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि व्यावसायिक श्रीनिवास प्रसाद हे मंगळवारी त्यांच्या जळालेल्या कारच्या डिक्कीमध्ये मृतवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्थानिय सरकारी रुग्णालयात पाठवला. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मेडक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक चंदना दीप्ती यांनी सांगितले की काही अज्ञातांनी भाजपा नेत्याला त्यांच्या कारसह पेटवून दिले. आम्हाला कारच्या डिक्कीत प्रसाद यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली जात आहे. श्रीनिवास प्रसाद हे बीजेपीचे माजी जिल्हा उपाध्‍यक्ष होते, तसेच त्यांचा व्यवसाय देखील आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.