नवी दिल्ली/गाझियाबाद: गाझियाबादमध्ये डीसीपी निपुण अग्रवाल यांनी गेमिंग अॅपद्वारे धर्मांतराबद्दल धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, लोकांना धर्मांतरासाठी यूट्यूब चॅनल दाखवण्यात आले, जे पाकिस्तानमधून चालवले जात आहे. या प्रकरणी केंद्रीय एजन्सींनी पीडितांशीही बोलणे केले असून पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाशी संबंधित माहितीची माहिती त्या एजन्सींना दिली आहे. याशिवाय त्यांनी काही ख्रिश्चनांच्या धर्मांतराबद्दलही सांगितले.
या प्रकरणात, केंद्रीय एजन्सी आयबीची एंट्री झाली असून, त्यांनी या प्रकरणातील दहशतवादी कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. त्याचे कनेक्शन महाराष्ट्रापासून चंदीगडपर्यंत जोडल्या गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. आतापर्यंत चार प्रकरणे समोर आले असून त्यापैकी दोन गाझियाबाद, एक फरिदाबाद आणि एक चंदिगडचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.
गाझियाबादमध्ये, किशोरवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये त्यांना फोर्टनाइट गेम जिंकण्याचे आमिष दाखवून आयत वाचण्यास सांगितले जायचे. एवढेच नाही तर प्रक्षोभक व्हिडिओ दाखवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केरण्यात येत होते. एका मुलाबद्दल असेही सांगण्यात आले की त्याला एका विशिष्ट धर्माच्या स्थळावर बोलावून त्या विशिष्ट धर्माशी संबंधित काम करण्यास सांगितले गेले होते.
गाझियाबादमध्ये पोलिसांनी धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी एका मौलानाला अटक केली आहे. यामध्ये ऑनलाइन गेमिंगद्वारे मुलांना आकर्षित करून त्यांचे धर्मांतर केले जात होते. या प्रकरणाचे तार महाराष्ट्राशी संबंधित आहेत. मुख्य आरोपी महाराष्ट्रात राहतो, त्याच्या शोधासाठी गाझियाबाद पोलिसांचे पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी कविनगर पोलिस स्टेशनमध्ये आमिष दाखवून धर्मांतराची घटना उघडकीस आली होती, ज्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये बद्दो नावाची व्यक्ती आढळून आली. सायबर शाखेने सांगितले की बद्दोचे खरे नाव शाहनवाज खान असून तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. या प्रकरणात नाव समोर आलेला मौलवी गाझियाबादच्या सेक्टर 23 मध्ये काम करतो. अब्दुल असे या मौलानाचे नाव असून त्याने एका जैन आणि दोन हिंदू मुलांना फूस लावून त्यांचे धर्मांतर केले होते. याला अटक करण्यात आली आहे.