ETV Bharat / bharat

Minors Girl Rape : माणुसकीला काळीमा! पाच वर्षाच्या मुलीवर पित्यानेच केला बलात्कार - पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट येथील घटना

आपल्या मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील बोप्पुडी गावात घडली आहे. ( Father Raped a Girl ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीाल वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असून आरोपीला अटक केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Apr 26, 2022, 12:00 PM IST

पालनाडू (आंध्र प्रदेश) - पाच वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेश राज्यातील पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट झोनमधील बोप्पुडी गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज रात्री मुलगा आईजवळ झोपतो. ( Raped by her father in Andhra Pradesh' ) तर, मुलगी वडिलांच्या शेजारी झोपते. एके दिवशी अंघोळ करताना मुलीने आईला सांगितले की मला वेदना होत आहेत. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. नूर भाषा आदम शफी असे आरोपीचे नाव आहे.

पाच वर्षांची मुलगी - नूर भाषा आदम शफीचा विवाह (2016)मध्ये हुसैन बी सोबत झाला आहे. हुसेन बी यांचे स्वतःचे गाव नादेंदला झोन पालनाडू जिल्ह्यातील अमीन साहेब पालेम गाव आहे. त्यांना एक मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. आदम शफी हा चिलाकालुरीपेठ येथील कलामंदिर केंद्रात एका किराणा दुकानात काम करतो. तर मुल शिक्षण घेत आहेत.

झोपेचे नाटक करत पकडले - मुलीने जे सांगितले ते ऐकून आईला धक्का बसला. रविवारी चौघे जेवून झोपले. दरम्यान पतीने 11 वाजता बाहेर जाऊन घरी येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी पत्नी हुसेनने झोपेचे नाटक करत तिचा नवरा काय करत आहे ते पाहीले. बायको झोपली की नाही हे नवऱ्याने चेक केले. त्याला बायको झोपली हे लक्षात आल्यानंतर त्याने मुलीशी काही चाळे करू लागला.

शासकीय रुग्णालयात दाखल - शफी आपल्या मुलीच्या शेजारी झोपला त्यावेळी त्याने मोबाईलवर ब्लू फिल्म्स पाहायला सुरूवात केली. आणि झोपलेल्या मुलीला त्रास देताना दिसला. पत्नीने हुसेन बी हिने लगेच त्याला पकडले. तिने लगेच कुटुंबीयांना माहिती दिली आणि पोलिसांत तक्रार केली. चिलकलुरीपेठ गाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी चिलाकालुरीपेठ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा - Elon Musk Bought Twitter : उद्योगपती इलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक! 44 अब्ज डॉलरचा व्यव्हार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.