ETV Bharat / bharat

राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचे सर्वसमावेशक उमेदवारीची प्रयत्न हे दिवा स्वप्नच - टीआरएस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर जेडीएसने माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि ममता यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा विचार केला. तसेच या पदासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांचाही विचार करण्यात आला. विरोधी पक्षाच्या उमेदवारावर मात्र अजूनही एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसमावेशक उमेदवार हे दिवास्वप्नच ठरेल असे दिसते.

राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचे सर्वसमावेशक उमेदवारीची प्रयत्न हे दिवा स्वप्नच

author img

By

Published : Jun 17, 2022, 10:23 AM IST

हैदराबाद: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसमावेशक विरोधी उमेदवारावर एकमत करण्यात अंशत: यश मिळालं. त्यांनी आमंत्रित केलेल्या बैठकीला 22 राजकीय पक्षांचे 17 प्रतिनिधी उपस्थित होते. तरीही एकाच विरोधी उमेदवारावर एकमत झाल्याचे दिसनाही.

बुधवारी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांना शरद पवारांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या अनास्थेमुळे विरोधकांची एकता धोक्यात आली आहे. या बैठकीनंतर स्वतः ममता म्हणाल्या की, “पवारांनी विरोधी पक्षाचा चेहरा व्हावा अशी आमची इच्छा होती, पण त्यांना त्यात रस नाही आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आम्ही राजकीय पक्षांना त्यांची नावे पाठवण्यास सांगितले आहे, जेणेकरून पुढील बैठकीत चर्चा करता येईल.”

बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की ते सध्या पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या उमेदवारीवर विचार करत आहे. परंतु या दोन उमेदवारांवर विरोधकांचे एकमत होण्याची शक्यता नाही. जेडीएसने यापूर्वीच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नाव पुढे केले आहे.

पक्षाच्या सूत्रांनी सूचित केले की देवेगौडा जे त्यांच्या मुलासह ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते, त्यांचे इतर राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. ते राष्ट्रपती निवडणुकीसाठी एक आदर्श उमेदवार असू शकतात. या बैठकीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामीही उपस्थित होते.

देवेगौडा हे सर्वसमावेशक उमेदवार ठरले तर काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ शकते. मात्र या बैठकीत काँग्रेसच्या सहभागामुळेच एका अर्थाने विरोधी पक्षांची एकजूट धोक्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव - ज्यांनी भाजपला पराभूत करण्याच्या त्यांच्या समान उद्दिष्टासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याची संधान बांधले होते. त्यांनी तर या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

टीआरएसच्या सूत्रांनी सांगितले की, "काँग्रेससोबत कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही". विशेष म्हणजे अलीकडेच केसीआर यांनी बंगळुरूला भेट दिली. दोन्ही जेडीएस नेत्यांशी दीर्घ चर्चा केली. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर हे नेते बोलल्याचा अंदाज बांधला जात होता. दक्षिणेकडील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची बैठक ही काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून मजबूत तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत असू शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात होता.

ममतांनी बोलावलेल्या बुधवारच्या बैठकीला टीआरएस, आप, अकाली दल बीजेडी, एसएडी, वायएसआरसीपी आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट याशिवाय सहभागी झाले नाहीत. असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला निमंत्रित करण्यात आले नव्हते. "मला निमंत्रण दिले नव्हते. मला निमंत्रित केले असते तरी मी सहभागी झालो नसतो. कारण तिथे काँग्रेस आहे. तृणमूल पक्ष, त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले असते, तर त्यांनी काँग्रेसला आमंत्रण दिले म्हणून आम्ही गेलो नसतो. असे ओवेसी म्हणाले होते.

अकाली दल आणि आम आदमी पार्टी (AAP) ने देखील काँग्रेसच्या उपस्थितीमुळे बैठकीला गैरहजेरी लावली. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित झाल्यानंतरच या प्रकरणाचा विचार केला जाईल, असे आप म्हणाले. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार निश्चित झाल्यावर हे पक्ष छातीजवळ पत्ते खेळताना दिसतात.

यापूर्वी, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, "माफ करा, कोण काय बोलत आहे, मला ते माहीत नाही. मला राष्ट्रपती होण्याची इच्छा नाही. काही दिवसांनी नाव कळेल." 2012 मध्ये, नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत होते. परंतु त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्या बाजूने मतदान केले होते. 2017 मध्ये, ते महाआघाडीसोबत असताना त्यांनी रामनाथ कोविंद- एनडीएचे उमेदवार यांच्या बाजूने मतदान केले.

झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते विनोद पांडे म्हणाले की, पक्ष एकमताने निवडला जाणारा उमेदवार उभा करण्याच्या संयुक्त विरोधी पक्षाच्या निर्णयाचे समर्थन करेल. झारखंड आरजेडीचे प्रवक्ते मनोज कुमार म्हणाले: "विरोधकांनी उमेदवाराचा निर्णय घेतल्यावर, आमचे नेते लालू यादव आणि तेजस्वी यादव समर्थनाचा अंतिम निर्णय घेतील."

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.