दाहोद (गुजरात) Scam of Rs 18 Crore : गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात सहा बनावट कार्यालयं तयार करुन तब्बल 18.69 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणात घोटाळेबाज संदीप राजपूत याची दाहोद पोलिसांनी ट्रान्सफर वॉरंटसह चौकशी केली. या घोटाळ्याचे धागेदोरे आता आयएएस अधिकारी बी.डी. निनामा यांच्यापर्यंच पोहोचलेत. निनामा हे 2019 मध्ये दाहोदमध्ये अनुदान विभागाचे प्रशासक होते. दाहोद पोलिसांनी निनामाला अटक केलीय. यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालीय.
माजी आयएएस अधिकारी बी.डी. निनामांची न्यायालयात हजेरी : छोटा उदेपूर येथील बोडेलीत पाटबंधारे विभागाचं बनावट शासकीय कार्यालय तयार करून 4.15 कोटींचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. तसंच पुढील तपासात एसआटीच्या अहवालात आरोपी संदीप राजपूतनं दाहोद जिल्ह्यात सहा बनावट कार्यालयं तयार केल्याचं समोर आलंय. दाहोद जिल्ह्यातही आरोपींनी सरकारी अनुदानाचा गैरवापर केल्याचं दाहोद पोलिसांच्या तपासात उघड झालंय. पुरावे आणि माहिती गोळा करुन, दाहोद पोलिसांनी प्रथम प्रशासक, आयएएस अधिकारी बी.डी. निनामाला अटक केली. या प्रकरणाबाबत माजी आयएएस अधिकारी बी.डी. नीनामाला दाहोद पोलिसांनी पुढील तपासासाठी रिमांडवर घेण्यासाठी दाहोद न्यायालयात हजर केलं होतं, त्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडालीय.
दाहोद जिल्ह्यात सहा बनावट कार्यालयं उभारुन अनुदान लाटल्याची तक्रार दाहोद जिल्हा प्रायोजकत्व अधिकाऱ्यानं केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलीय. ज्यामध्ये संदीप राजपूत हा बनावट सरकारी अधिकारी बनला होता. काही ठिकाणी चुकीच्या सह्या होत्या. चुकीच्या कार्यालयांच्या नावानं बँक खाती उघडून येथील शासकीय कार्यालयाशी संपर्क साधणारा आणखी एक अंकित सुथार चुकीची कामं करत होता. त्यावेळी जिल्हा प्रायोजकत्व अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नीनामा यांचाही सहभाग आणि संगनमताचे पुरावे सापडल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली आहे. - राजदीपसिंग झाला (दाहोद जिल्हा पोलीस प्रमुख)
शासकीय अनुदानाचा दुरुपयोग : दाहोद जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यानं येथील जनता अशिक्षित असून, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे लोक आणि अधिकारी यांचं मेतकूट जमल्यानं जनतेला योजनेचा लाभ मिळाला नाही व शासकीय अनुदानाचा दुरुपयोग झाला.
हेही वाचा :