ETV Bharat / bharat

Boy Dies While Flying Kite पतंग उडवताना हायटेंशन वायरचा धक्का लागल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू - व्हिक्टोरीया रुग्णालयात उपचारासाठी दाखल

पतंग उडवताना हायटेंशन वायरचा धक्का लागून 12 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी बंगळुरुतील चामुंडी नगर येथील विश्वेश्वरय्या लेआऊटमध्ये घडली. पतंग उडवताना मुलाच्या झालेल्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Boy Dies While Flying Kite In Bengaluru
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 18, 2023, 10:53 PM IST

बंगळुरू - घराच्या टेरेसवर पतंग उडवताना हायटेंशन वायरचा धक्का लागल्याने एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी आरटी नगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील चामुंडी नगर येथील विश्वेश्वरय्या लेआऊटमध्ये घडली. अबुबकर असे हायटेंशन वायरचा धक्का लागून मृत्यू झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचे नाव आहे.

पतंग उडवताना लागला धक्का : बारा वर्षाचा मुलगा पतंग उडवत असताना त्याला हायटेंशन वायरचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच त्याला व्हिक्टोरीया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर व्हिक्टोरीया रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

नातेवाईकांनी दिली नाही तक्रार : पतंग उडवताना हायटेंशन वायरचा धक्का लागल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र घटना घडल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती दिली. मुलाच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील असेही पोलीस आर टी नगर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.

कुटुंबावर मोठी शोककळा : पतंग उडवताना अबुबकर या मुलाचा हायटेंशन वायरला धक्का लागल्याने मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे नातेवाईक या धक्क्यातून अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी अद्यापही पोलीस तक्रार दाखल केली नाही. अबुबकरचा दुर्दैवी झालेल्या मृत्यूमुळे शहरात लोंबकळणाऱ्या हायटेंशन वायरच्या उंचीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कबुतराला पकडताना झाला होता दोन बालकांचा मृत्यू : पतंग उडवताना हायटेंशन वायरला धक्का लागल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारकी शहरात पसरली. या अगोदरही 1 डिसेंबरला सुप्रित आणि चंदू या दोन बालकांचा कबुतर पकडताना मृत्यू झाला होता. हे दोघेही कबुतर पकडताना हायटेंशन वायरला धडकले होते. ही होन्ही मुले हायटेंशन वायरला धडकून गंभीर झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची मृत्यूशी झुंज सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पालकांचा राग अनावर झाल्याने त्यांनी हायटेंशन वायर कमी उंचीवर लावलेला असल्याने चांगलाचा राडा केला होता.

हे ही वाचा - Chinese Manja death : पतंगबाजी चिमुकल्याच्या जीवावर उठली; ११ वर्षीय चिमुकल्याचा गळा कापल्याने मृत्यू

हेही वाचा - Bus accident In Satara : सहलीच्या बसची कंटेनला धडक, तीन शिक्षक, तीन विद्यार्थी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.