हैदराबाद : ज्या वयात लोक सहसा नीट बसू शकत नाहीत, त्या वयात भगवानी देवीने ( Sprinter dadi Bhagwani Devi wins ) भारतीय तिरंग्याचा परदेशात मान वाढवला आहे. भगवानीने ज्येष्ठ नागरिक गटात 100 मीटर शर्यतीत सुवर्ण, तर शॉटपुटमध्ये (गोळाफेक) कांस्यपदक पटकावले.
-
India's 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.🥇She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!👏 pic.twitter.com/Qa1tI4a8zS
">India's 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.🥇She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!👏 pic.twitter.com/Qa1tI4a8zSIndia's 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.🥇She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!👏 pic.twitter.com/Qa1tI4a8zS
फिनलंडमधील टॅम्पेरे येथे झालेल्या जागतिक मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 'स्प्रिंटर दादी' भगवानीने 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. त्यांनी 24.74 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक ( Sprinter dadi Bhagwani Devi win Gold ) जिंकले. यासोबतच त्यांनी शॉटपुटमध्येही (गोळाफेक) कांस्यपदक पटकावले आहे. त्यांनी तिरंगा जर्सी परिधान केली आहे, ज्यावर भारत असे लिहिले आहे, ती पदक दाखवताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सध्या खुप व्हायरल होत आहे.
भगवानी देवीचा हा फोटो व्हायरल ( Bhagwani Devi photo goes viral ) होत असून प्रत्येकजण त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांचे फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयाने लिहिलेले, ''भारतातील 94 वर्षीय भगवान देवी यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे की, वय फक्त एक संख्या आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. खरोखर साहसी कामगिरी.''
भगवान देवी डागर ( Runner Bhagwan Devi Dagar ) मुख्यत्वे हरियाणातील खिडका गावातील आहेत. मलिकपूर गावातील डागर कुटुंबात भगवानीचा विवाह झाला होता. त्यांचा नातू विकास डागर हा आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलीट आहे.
हेही वाचा - Rohit Support To Virat : कोहलीला संघातून वगळण्याच्या मागणीला कर्णधार रोहितचे चोख प्रत्युत्तर