ETV Bharat / bharat

भारत आणि महाराष्ट्रातील गंभीर स्वरूपातील कुपोषित मुलांचे प्रमाण किती? - malnutrition

नोव्हेंबर 2020 पर्यंत देशात सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील 9,27,606 'गंभीर कुपोषित' मुले आढळली आहेत. सर्वाधिक 3,98,359 मुले उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये 2,79,427 मुले आढळली आहेत. लडाख, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर राज्यात एकही गंभीर स्वरुपातील कुपोषित बालक आढळले नाही.

कुपोषण
कुपोषण
author img

By

Published : Jun 6, 2021, 8:05 PM IST

नवी दिल्ली - देशभरातील 9.2 लाखांहून अधिक मुले 'गंभीर स्वरूपातील कुपोषित' आहेत. तर सर्वांत जास्त प्रमाण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आहे. कोरोनाच्या या संकटात ही संख्या आणखी वाढू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशात सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील 9,27,606 'गंभीर कुपोषित' मुले आढळली आहेत. सर्वाधिक 3,98,359 मुले उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये 2,79,427 मुले आढळली आहेत. लडाख, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर आणि मध्य प्रदेशात एकही गंभीर स्वरुपातील कुपोषित बालक आढळले नाही.

गंभीर कुपोषण झालेल्या मुलांची उंची आणि वजन कमी असते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोणत्याही आजारामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नऊपट जास्त असते. महिला व बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कुपोषित बालकांची नोंदणी करण्यास सांगितले होते. जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करता येईल. त्यानंतर 9,27,606 हा आकडा समोर आला आहे. जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर ही संख्या आणखी वाढू शकते.

इतर राज्यातील आकडेवारी...

महाराष्ट्रातील गंभीर कुपोषित बालकांची संख्या 70,665 आहे. त्यानंतर गुजरातचा क्रमांक असून गुजरातमध्ये 45,749, छत्तीसगडमध्ये 37,249, ओडिशा 15,595, तामिळनाडू 12,489, झारखंड 12,059, आंध्र प्रदेश 11,201, तेलंगणा 9,045, आसाम 7,218, कर्नाटक 6,899, केरळ 6,188 आणि राजस्थान 5,732 आहे. देशभरातील सुमारे दहा लाख अंगणवाडी केंद्रांतून कुपोषित बालकांची नोंदणी करण्यात आली आहे.

कुपोषण म्हणजे काय ?

पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल. कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात न वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.