कोलकाता- पश्चिम बंगालमधील ईग्रा, पूर्व मेदिनीपूर येथे मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व मेदिनीपूरचे पोलीस अधीक्षक अमरनाथ यांनी पत्रकार परिषदेत घटनेची माहिती दिली आहे. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढून एग्रा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
घटनास्थळी अनेक मृतदेह विखुरलेले होते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गावात मोठा आवाज झाला. त्याच्या आवाजाने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरल्यानंतर आजूबाजूचे लोकही घटनास्थळी आले. पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपचा तृणमुलवर आरोप- पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी हा स्फोट टीएमसी नेत्याच्या कारखान्यात झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे ऐन पंचायत निवडणुकीपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी व्हावी, यासाठी गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिणार असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत. बेकायदेशीर फटाका कारखाना चालवल्याच्या आरोपावरून बाग यांना गेल्या वर्षी १९ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले. पण जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने ओडिशाच्या सीमावर्ती भागात अवैध कारखाना सुरू केला. या घटनेला तृणमुल किंवा प्रशासन जबाबदार नसल्याचा दावा ममता यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नबन्ना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा एनआयएकडून तपास करण्यास राज्याचा कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना अडीच लाख आणि जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्तव्य न बजावणाऱ्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-