पाटणा : चार वर्षांपूर्वी बिहारच्या गोपालगंजमध्ये असणाऱ्या खजूरबानी येथील विषारी दारू प्रकरणी आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील एकूण १३ आरोपींपैकी नऊ जणांना फाशी, तर चार महिलांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली. गोपालगंजच्या एडीजे-३ न्यायालयाने याबाबत निकाल दिला.
१९ जणांचा झाला होता मृत्यू..
या प्रकरणात विषारी दारुमुळे तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर, सुमारे ६ लोक दृष्टीहीन झाले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी नगीना पासी आणि रुपेश शुक्ला यांच्यासह एकूण १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. यांपैकी एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. आता यातील जिवंत असणाऱ्या १३ आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात आली.
हेही वाचा : पश्चिम बंगाल विधानसभा : तृणमूलची पहिली यादी जाहीर; ममता नंदीग्राममधून लढणार निवडणूक