ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 12 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर - 8-people-killed-Poisonous liquor

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात विषारी दारू पिऊन 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात 12 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.त्यातील ५ जण गंभिर आहेत.

मुरैना जिल्ह्यात विषारी दारू पिऊन आठ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 12, 2021, 10:14 AM IST

Updated : Jan 12, 2021, 1:58 PM IST

मुरैना - मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात विषारी दारू पिऊन 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात 12हून अधिक जण आजारी पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आजारी लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

10 जणांचा मृत्यु, 5 जण गंभिर
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बागचीनी परिसरात छेरा मानपूर गाव आणि सुमावलीतील पहवाली या गावात घडली आहे. छेरा मानपूर गावात विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर पहवाली गावातील एकाचा मृत्यू झाला. मात्र आजारी रूग्णांपैकी सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 2 जणांना ग्वाल्हेरमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.

उज्जैन विषारी दारु घटना

मध्य प्रदेशात विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाही. 14 ऑक्टोबर 2020 रोजी उज्जैनमध्ये विषारी दारू पिऊन 16 जणांचा मृत्यू झाला होता. अल्कोहोल तयार करण्यासाठी इथेनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळले गेले होते. अधिकारी प्रीती गायकवाड यांनी याबाबत तपास केला होता. मिथेनॉल हे मानवी शरीरासाठी विष मानले जाते. त्याचे 10 एमएल इतके प्रमाण मनुष्याला आंधळे करु शकते. नगरपालिका कर्मचारी युनुस सिकंदर हे दोघे याप्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी पालिका कार्यालयाच्या गच्चीवर ही दारु बनवली होती.

बडवानीमध्येही अशीच घटना

6 सप्टेंबर 2020 रोजी बडवणीच्या निवालीमध्येही विषारी दारू पिऊन दोन जणांचा मृत्यू झाला. सेंधवा येथील दिवानिया या गावात दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जण आजारी पडले होते.

हेही वाचा - सीरमच्या 'कोविशिल्ड' लसीचे देशभरात वितरण सुरू, विमातळावरून 'ईटीव्ही भारत'चा आढावा

Last Updated : Jan 12, 2021, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.