ETV Bharat / bharat

Truck accident in Purnia : बिहारच्या पूर्णियात भीषण अपघात, पाईपने भरलेला ट्रक पलटी, 8 लोकांचा मृत्यू - truck accident purnia

बिहारमधील पूर्णिया येथील जलालगढ पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एनएच 57 वर पाईपने भरलेला ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

road accident in purnea
ट्रक अपघात पूर्णिया
author img

By

Published : May 23, 2022, 10:16 AM IST

पूर्णिया (बिहार) - बिहारमधील पूर्णिया येथील जलालगढ पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एनएच 57 वर पाईपने भरलेला ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये सुमारे 12 जण होते, असे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवले.

हेही वाचा - Gold silver rate 23 may : सोन्याच्या दरात वाढ.. जाणून घ्या आजचे दर

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच, मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले. ट्रक कुठून येत होता आणि कुठे जात होता हे अद्याप समजू शकले नाही. घटनेनंतर ट्रक चालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाईपने भरलेला ट्रक भरधाव वेगाने जात होता. चालकाला झोप लागली असावी, त्यामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. ट्रकवरील सर्व लोक हे कामगार असल्याचे दिसून येते. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Todays Petrol Diesel Rate : केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर पेट्रोल डीझेलचे दर घसरले, वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.