ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज येणार भाजपाचा जाहीरनामा; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

todays top news
todays top news
author img

By

Published : Feb 8, 2022, 6:15 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर

  • आज येणार भाजपाचा जाहीरनामा -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे (BJP) संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध करतील.

  • आज भाई जगताप यांची पत्रकार परिषद -

आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी ते राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर बोलण्याची शक्यता आहे.

  • भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन

भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहेत.

  • गॅंगस्टर सुरेश पुजारीच्या कस्टडीवर फैसला

गॅंगस्टर सुरेश पुजारीची पोलीस कस्टडी आज संपणार त्यामुळे त्याला पुन्हा पोलिस कस्टडी मिळते की न्यायालयीन कोठडी याचा फैसला आज होणार आहे.

  • श्‍वेता सिंगची जामीन अर्जावर आज सुनावणी

बुली बाई अॅप प्रकरणातील उत्तराखंडमधून अटक करण्यात आलेली आरोपी श्‍वेता सिंगच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

  • आज ओबीसी आरक्षणावर सुणावणी

आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी संदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी महत्त्वाची आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या -

पणजी - देशात सर्वात जास्त बेरोजगारी गोव्यात असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi Spoke About Employment ) यांनी केले होते. त्यांच्या या आरोपाला भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Reply To Priyanka Gandhi ) यांनी उत्तर दिले आहे. देशातील सर्वात जास्त बेरोजगारी गोव्यात नसून राजस्थानमध्ये असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच या गोष्टीकडे न लक्ष देता गोव्याबद्दल असे बोलणे म्हणजे गोवेकरांचा अपमान आहे. अशा पद्धतीने त्यांना गोव्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही. प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा राजस्थानवर बोलावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या ( Narendra Modi Speech In Parliament ) भाषणानंतर काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकार व भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली ( Congrees Critisized Narendra Modi ) आहे. या टीकेचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Praveen Darekar Critisized Congress ) यांनी मोदींच्या भाषणावर काँग्रेस नेत्यांची आगपाखड होणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

मुंबई - कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत, हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केली आहे.

सातारा : तालुक्यातील समर्थगावजवळ असलेल्या भंगारातील प्लास्टिकचे रिसायकलिंग ( Plastic Recycling Company Fire ) करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत कंपनीचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई - पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात ( Pune Covid Hospital Scam ) पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेलेल्या किरीट सोमैया ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली व त्यात ते जखमी झाले. याबाबत बोलताना किरीट सोमैया यांनी ( Kirit Somaiya Spoke About Shivsena Attack ) शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता व त्याबाबत त्यांनी ट्विटरवर एक
व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. त्यामध्ये एक दगड त्यांना मारण्यासाठी उचलण्यात आला होता, असे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.